बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

0

गुहागर दि. १८ (रामदास धो. गमरे) बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गुहागर, या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन के. सी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता कुणबी ज्ञाती समाज हॉल, शृंगारतळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सदर प्रसंगी अध्यक्ष के. सी. जाधव यांनी ज्योत प्रज्वलित करून महामानवांच्या प्रतिमांस पुष्पहार अर्पण करून सभेस सुरवात झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे चिटणीस महेंद्र मोहिते यांनी लाघवी भाषाशैलीत प्रभावी व पहाडी आवाजात केले. या वर्षात ज्या सभासद व त्यांच्या कुटुंबियांचे दुःखद निधन झाले त्या सर्वांसाठी सभागृहात दुःखद ठराव पारित करून त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सोबतच तालुक्यातून विविध शैक्षणिक शाखांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तसेच राष्ट्रीय पातळीवर नॅशनल लेव्हल परफॉर्मर म्हणून सुवर्णपदकाने सन्मानित कु. आर्या जाधव यांचा गुणगौरवाचा ठराव पारित करून त्यांना उज्वल भविष्याच्या मंगलकामना देण्यात आल्या.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

सदर दिवशी साधारण पाऊस व गावोगावी ग्रामसभा असल्याने सुरवातीला कमी उपस्थिती पाहून अध्यक्षांनी अर्धा तास सभा तहकूब केली अर्धा तासाने लोकांची उपस्थिती व प्रतिसाद पाहून सभेला प्रारंभ केला सदर सभेत ३१ मार्च २०२५ रोजीचा अखेरचा ताळेबंद अहवालाचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली तसेच लेखापरीक्षण अहवाल वाचन व दुरुस्ती करणे, नवीन आदर्श उपविधीचा स्वीकार करणे, २०२५ ते २०२६ या कालावधीतील अंतर्गत हिशोबतपासणी म्हणून ऑडिटर शैलेंद्र पवार यांची तर लेखापरीक्षक म्हणून मधुकर मोहिते यांची नियुक्ती करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करून पारित करण्यात आला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अध्यक्षीय भाषणात बोलताना “आम्हा संचालक मंडळाला कामकाजासाठी फक्त आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी मिळाला असला तरी इतक्या कमी कालावधीत आपण सतरा लाखापेक्षा जास्त उलाढाल आपल्या पतसंस्थेद्वारे केली आहे याचे सर्व श्रेय आपल्या सभासदांना जाते, सर्वांच्या साथीमुळे एक उल्लेखनीय अशी कामगिरी करण्यात पतसंस्थेला यश आले असून यापुढे ही अशीच साथ लाभल्यास अजून चांगल्या प्रकारे पारदर्शक कामकाज करता येईल, लवकरच पतसंस्थेचे सॉफ्टवेअर, ऑनलाईन व्यवहार सुरू करण्याचे ठराव कार्यकारी मंडळाने मंजूर केले असून महिनाअखेर पर्यंत ती कामे ही मार्गस्थ लागतील” असे सुचोवाच अध्यक्ष के. सी. जाधव यांनी केले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सदर कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, तज्ञ संचालक संजय पवार, संचालक शैलेंद्र पवार, दिपक मोहिते, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, संजय तांबे, विश्वास मोहिते, रुपेश सावंत, प्रकाश जाधव, संतोष दामले, सदानंद पवार, मधुकर गमरे, भूषण पवार आदी कार्यकर्ते व स्त्री-पुरूष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सभा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे चिटणीस महेंद्र मोहिते आभार मानले व राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.