वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा नवा कारनामा; पोलिसांवर कुत्रे सोडले लावलेली नोटीस फाडली

0

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली. पोलिसांना सहकार्य केले नसल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली. मात्र, घरी नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत अत्यंत भयानक प्रकार घडला. हेच नाही तर पोलिसांच्या अंगावर चक्क कुत्रे सोडण्यात आली. नोटीस घेणे तर फार दूरची गोष्टी. पोलिसांनी घरावर लावलेली नोटीसही फाडण्यात आली. यावेळी अधिकाऱ्याच्या अंगावर कुत्रे सोडले. पोलिसांनी घरावर नोटीस लावून सहकार्य केले नाही तर ताब्यात घेण्याची नोटीस दिली आहे.

पुणे शहर पोलिसांनी वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर भा.दं.सं. कलम 221 शासकीय कामात अडथळा आणणे, कलम 238 गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे किंवा चुकीची माहिती देऊन आरोपींना कायदेशीर शिक्षेतून वाचवणे आणि कलम 263 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

हा प्रकार नवी मुंबईतील रोड रेज प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रक ड्रायव्हरच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला मनोरमा खेडकर यांच्या घरी आणले होते. तपासादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणाचा मागोवा घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, पोलिसांचा आरोप आहे की, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात प्रवेश करण्यास विरोध केला आणि आरोपीला पळून जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला.

पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांचे नाव चालकाच्या अपहरणाच्या प्रकरणात आले असून पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले असता त्यांना पळून जाण्यास पूजाच्या आईने मदत केली. पोलिस सध्या पूजा खेडकर हिच्या वडिलांचा शोध घेत आहेत. बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. फक्त पूजा खेडकर याच नाही तर त्यांचे कुटुंबिय देखील चर्चेत आहे. काही धक्कादायक खुलासे केली जात आहेत. पूजाच्या वडिलांवर गंभीर आरोप असून त्यांचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी पोलीस दाखल झाले. याबद्दल बोलताना नुकताच पीआय भजनाळे यांनी म्हटले की, नवी मुंबईतील पोलिसांना सहकार्य न केल्याबद्दल मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नवी मुंबई पोलीस कर्मचारी आमच्याकडे आले होते. त्यावेळी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी अरेरावी केली सरकारी कामात अडथळा आणला आरोपींना पळवून लावले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या संदर्भातला तपास करण्यासाठी आज आम्ही तपास कार्य सुरू केला आहे. यातील जे आरोपी आहेत त्यांना लवकरच पोलिसांकडून शोधलं जाईल.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता