सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारकाची स्वच्छता मोहीम; स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचा  अभिनव उपक्रम

0

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी या दिवाळीतील पहिला दिवा अर्पण करून दिवाळीची सुरुवात केली जाते. मोसे खोऱ्यातील वरसगाव येथील पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारकास दीपोत्सव करण्याचा स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान येथे दरवर्षी दिपोस्तवाचे संकल्प करून तो पूर्णत्वास आणला जातो व या दिवाळीची सुरुवात केली जाते.. त्यामुळे दिवाळी च्या अगोदर स्मारकाचा सर्व परिसर स्वच्छ केला जातो. स्वच्छता मोहिमेची सुरुवात वीर बाजी पासलकर यांच्या स्मारकाची पूजा करून व श्रीफळ वाढवून करण्यात आली. त्यानंतर शंखनाद करून जिजाऊ गर्जना , शिवगर्जना व शंभू गर्जना करण्यात आली.त्यानंतर वाढलेले गवत झाडे झुडपे काढण्यात आली त्यामुळे स्मारकाला नवसंजीवनी मिळते,अशा प्रकारे दिवसभर भर पावसात स्मारक परिसरात साफसफाई करून त्याची विल्हेवाट लावली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे आर्यन जागडे, साहिल जागडे, सूरज तेलावडे, गणेश शेडगे, अनिकेत नलावडे, गणेश नलावडे, अभि मानकर, अविनाश चोरगे, मंगेश नवघणे शिलेदार उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठानचे अक्षय जागडे यांनी स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान चे कार्य व संस्था स्थापने मागचा उद्दिष्ट स्पष्ट केले. आपल्या भावी पिढीला इतिहास व गड किल्ले हे शाश्वत स्वरूपात बघता यावेत व छत्रपती श्री शिवाजी महाराज व शंभू महाराज यांचे संस्कार आपल्या भावी पिढीत कसे रुजवता येतील व संवर्धना बद्दलजन जागृती करून थोडक्यात आपले मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज शंभू महाराज यांच्या जयघोषात व स्मारकास वंदन करून मोहिमेची सांगता करण्यात आली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार