इलेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब तळवली यांच्या विद्यमाने शेती मार्गदर्शन व शेती लागवड शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न

0
11

गुहागर दि. २९ (रामदास धो. गमरे) सध्याच्या काळात अनेक शेतकरी अधिक नफ्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात याने तात्पुरता फायदा होत असला तरी दुरगामी दुष्परिणाम होतात रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे जमिनीतील चांगल्या सूक्ष्मजीवांची हानी होऊन जमिनीची सुपीकता कमी होते, रासायनिक खतांमधील रसायने मातीमध्ये साचून माती दूषित होऊन तिचा पोत व कस कमी होतो, रासायनिक खतांमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होऊन भूजल जलसंवर्धन प्रक्रिया बंद होऊन जमिनीतील पाण्याचे साठे कमी होतात पर्यायी संपूर्ण निसर्गचक्राचा तोल ढासाळून शेतीस पूरक वातावरण व जमिनीचा कस न राहिल्याने पिकांचे उत्पादन घटते त्यामुळे खर्च जास्त व उत्पादन कमी झाल्याने कर्जाच्या बोझाखाली दबला गेलेला शेतकरी चुकीच्या मार्गावर जातो म्हणून शेतीमध्ये नवीन अस जल, जमीन, निसर्गाला पूरक अश्या शेत उत्पन्न वाढवणाऱ्या शेती लागवड पद्धतीचा वापर केला पाहिजे हा एक उद्देश मनाशी धरून इलेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब तळवली यांच्या विद्यमाने शेती मार्गदर्शन व शेती लागवड शिबीर राजेंद्र यशवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता मराठी शाळा नं. ०१, तळवली, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

सदर प्रसंगी मार्गदर्शक म्हणून कृषी विद्यापीठ दापोलीचे डॉ. विजय आवारे, गुहागर तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, तालुका सहाय्यक कृषी अधिकारी डी. के., तालुका सहाय्यक कृषी अधिकारी अमित शेळके, शालेय शिक्षक डॉ. मनोज पाटील हे मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती त्यासर्वांचे कार्यक्रमाचे व स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष राजेश यशवंत पवार यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, स्पोर्ट्स क्लबचे सचिव मंदार दामोदर पवार यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना सदर शिबिराची ध्येय, उद्दिष्टे व उद्देश समजावून सांगितले तसेच त्यांनी आपल्या धीरगंभीर व पहाडी आवाजात कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

सदर प्रसंगी उपस्थित मार्गदर्शकांनी “सेंद्रिय शेती काळाची गरज असून नैसर्गिक घटकांचा वापर करून मातीची गुणवत्ता सुधारता येते व पर्यावरणाची काळजी घेते आणि विषमुक्त अन्न उत्पादन पिकवता येते ज्यामुळे ती एक आवश्यक आणि शाश्वत शेती पद्धत असून त्याचा वापर ही काळाची गरज आहे” असे स्पष्ट मत नमूद केले व त्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्व पटवून दिले. सरतेशेवटी सदर शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष शांताराम अंबाजी पवार, सहसचिव प्रशांत भागूराम पवार, खनिजदार उज्ज्वल जनार्दन पवार, उप. खजिनदार संतोष राजाराम पवार, हिशेब तपासणीस मनीष मुकुंद पवार, सदस्य नित्यानंद यशवंत जाधव, दिनेश यशवंत पवार, राकेश हरिश्चंद्र पवार, सुशांत श्रीपत पवार, विनोद भिकाजी पवार, आदित्य किसन पवार, उदय अर्जुन पवार, अमर अनंत कांबळे यांचे तसेच मार्गदर्शक पाहुण्यांचे, उपस्थित ग्रामस्थ, शेतकरी बांधव यांचे आभार मानून सचिव मंदार दामोदर पवार यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय