पंतप्रधान मोदींचा मोठा विक्रम, इंदिराजींचा रेकॉर्ड मोडला; आता नेहरूंशी स्पर्धा सुरू? ….२४ वर्षांहून अधिक नेतृत्व!

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन विक्रम केला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा मोठा विक्रम मोदींनी स्वतःच्या नावे केला आहे. नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ भारताचं पंतप्रधान भूषवणारे दुसरे नेते ठरले आहेत. मोदी यांनी आज (शुक्रवार, २५ जुलै २०२५) भारताचे पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले आहेत. सलग हे पद भूषवण्याच्या बाबतीत त्यांनी इंदिरा गांधींना मागे टाकलं आहे. तसेच मोदी यांनी राज्य व केंद्रातील कारभार मिळून २४ वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व केलं आहे. हा देखील सर्व पंतप्रधानांमधील मोठा विक्रम आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ असे सलग ४०७७ दिवस (११ वर्षे ५९ दिवस) भारताच्या पंतप्रधान म्हणून कारभार पाहिला होता. तर मोदी २६ मे २०१४ पासून या पदावर आहेत. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस० वर्षे ६० दिवस) पूर्ण केले आहेत.मोदींच्या नावावरील इतर मोठे विक्रम

मोदी यांच्या पतंप्रधानपदाच्या कारकिर्दीविषयी इतरही काही मनोरंजक तथ्ये आहेत. जसे की, ते स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले व एकमेव पंतप्रधान आहेत. तसेच सर्वाधिक काळ भारताचं पंतप्रधानपद भूषवणारे बगर-काँग्रेसी नेते आहेत. मोदी हे आजवरचे भारतातील सर्व पंतप्रधान व वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी एकमेव असे नेते आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वात भाजपाने २००२, २००७ व २०१२ च्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजपा विजयी झाली होती. तसेच मोदींच्य नेतृत्वात भाजपाने २०१४, २०१९, २०२४ च्या लोकसभा निवडणुका लढवल्या. या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजपा विजयी झाली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

आता पंडित नेहरुंशी स्पर्धा?

सलग सर्वाधिक काळ भारताचं पंतप्रधानपद भूषवण्याच्या बाबतीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आघाडीवर आहेत. त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत सलग ६,१२६ दिवस (१६ वर्षे २८६ दिवस) भारताचं नेतृत्त्व केलं आहे. मोदी यांना नेहरुंचा हा विक्रम मोडण्यासाठी आणखी २०४८ दिवस भारताचं नेतृत्त्व करावं लागले. त्यासाठी त्यांना व भाजपाला पुढची म्हणजेच २०२९ ची लोकसभा निवडणूक देखील जिंकावी लागेल.