कर्वेनगरमध्ये आज रंगतोय आखाड स्पेशल ‘आनंद’ उत्सव; सन्मान सामाजिक भान ‘लाडक्या बहिणी’ही खुशच होणार

0
22

भारतरत्न डॉक्टर महर्षी कर्वे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिंगणे बुद्रुक (कर्वेनगर) भूमीत सामाजिक जाणिवेचे भान ठेवून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व डॉ. आनंद (बंडूशेठ) तांबे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक भान ठेवून ठेवून देशी फळझाडांचे वृक्षारोपण, रक्तदान व सर्वसामान्य रिक्षाचालकांसाठी लकी ड्रॉ अशा त्रिवेणी संगमाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यभर सर्वत्र आज आखाड समाप्तीची गटारी अमावस्या साजरी केली जात असताना पारंपरिक हिंदू सणाचे पावित्र्य कायम राखत घराघरांमध्ये हा हिंदू सण साजरा केला जावा यासाठी प्रत्येक रक्तदात्यासाठी १ किलो चिकन किंवा अर्धा किलो मलई पनीर किंवा टी-शर्ट अशी सप्रेम भेट योजना ठेवण्यात आल्यामुळे कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनी परिसरामध्ये आखाड स्पेशल आनंद उत्सव साजरा केला जाणार हे मात्र नक्की!

महाराष्ट्राचे लोकप्रिय सहावे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘आनंद’उत्सव साजरा करताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सलग सहाव्यांदा उपाध्यक्ष असलेले डॉक्टर आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांच्यावतीने हिंदू पारंपारिक सण गटारी अमावस्या घराघरात दीपोत्सव करताना आनंद उत्सवात साजरी केली जावी यामध्ये खारीचा वाटा म्हणून रक्तदान शिबिराच्या निमित्ताने पनीर वाटप असा उल्लेखनीय उपक्रम राबवला. रक्तदात्याला कोणत्याही (हेल्मेट ब्लूटूथ पावर बॅंक हेडफोन प्लास्टिक बाटल्या टी-शर्ट) वस्तू देण्यात आल्या तरी सुद्धा खरा रक्तदात्याचा सन्मान त्याच्या घरात होण्यासाठी गटारी अमावस्या या पवित्र सणाच्या निमित्ताने पनीर वाटप हा अभिनव उपक्रम राबवल्याने हिंगणे होम कॉलनी व कर्वेनगर परिसरातील ‘लाडक्या बहिणीं’कडूनही महाराष्ट्राची लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी नक्कीच शुभेच्छा मिळतील असे आयोजक डॉक्टर आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस परिसरातील नागरिकांनी अत्यंत आनंद उत्सवामध्ये साजरा करावा यासाठी सुप्रसिद्ध गायक संजय मरळ प्रस्तुत मराठी हिंदी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी 6 ते 8  आयोजित करण्यात आला असून संजय मरळ व डॉ. अनघा राजवाडे हे सुप्रसिद्ध कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्याबरोबरच महाराष्ट्राचे लाडके भाऊजी बाळकृष्ण नेहरकर यांच्या उपस्थितीत रिक्षा चालकांसाठीचा भव्य लकी ड्रॉ ही आयोजित करण्यात आला आहे. या लकी ड्रॉ मध्ये स्मार्ट वॉच, 3रिक्षा टायर, युनिफॉर्म(2शर्ट), रिक्षा संपूर्ण हुड, हेडफोन अशा रिक्षा चालकांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी दिल्या जाणार आहेत. याबरोबरच विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सहभागी रिक्षा चालकांसाठी हमखास भेट म्हणून HSRP नंबर प्लेट ब्रॅकेट किंवा मीटर कव्हर कार्यक्रम स्थळीच देण्यात येणार आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे वरिष्ठ उपाध्यक्ष, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. आनंद तांबे यांना मानद डॉक्टरेट हा सन्मान प्रदान करण्यात आहे. गेल्या ४० वर्षांपासून वंचित, दुर्लक्षित, गोरगरीब आणि रिक्षा चालकांच्या हक्कांसाठी अथक कार्य करणाऱ्या डॉ. आनंद तांबे यांनी पुणे शहरातील रिक्षा व्यवसायाला नवे स्थान मिळवून दिले. रिक्षा स्टँडची निर्मिती, प्रवासी, रिक्षा चालक व प्रशासन यांच्यातील संबंध मजबूत करणे, तसेच दिव्यांग, अपंग, विधवा महिला, सामाजिक आणि  शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. दिल्ली येथील भव्य समारंभात CEDARBROOK UNIVERCITY USA  या विद्यापीठाकडून HONORARY DOCTORATE  हा बहुमान डॉक्टर आनंद तांबे यांना प्रदान करून त्यांच्या चाळीस वर्षातील सामाजिक कार्याची व अथक परिश्रमाची दखल घेत, हा सन्मान त्यांच्या योगदानाचा व समर्पणाचा खऱ्या अर्थाने गौरव करण्यात आला. डॉक्टर आनंद तांबे यांचा पुण्यातील पहिला रिक्षा चालक मालकांतर्फे डॉ. आनंद तांबे यांचा ‘पुणेरी पगडी’ सन्मान पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या समवेत करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे