डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर; महेश टेळेपाटील यांची फेरनिवड, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान

0
26

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बहुप्रतीक्षित कार्यकारिणी बैठक बुधवार, २३ जुलै रोजी हॉटेल कुणाल, तापकीर चौक, काळेवाडी, पिंपरी चिंचवड येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर नवीन कार्यकारणी राज्य समन्वयक अमोल पाटील यांच्या पुढाकाराने जाहीर करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या बैठकीला संस्थापक अध्यक्ष राजा माने, महाराष्ट्र सरचिटणीस महेश कुगावकर, प्रदेश उपाध्यक्ष सावंत साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य समन्वयक अमोल पाटील,पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुंबे, पुणे शहर अध्यक्ष महेश टेळेपाटील, पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रशांत साळुंखे आदी पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर, संपादक, आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘न्यूजमेकर.लाईव्ह’चे संपादक महेश टेळेपाटील यांची पुणे शहराध्यक्ष पदावर फेरनिवड बिनविरोध करण्यात आली. त्यांच्या गतकाळातील सक्रिय सहभाग आणि नेतृत्वगुण यांची संघटनेने एकमुखाने दखल घेतली. त्यांच्यासह विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांचीही कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली.

नवीन पुणे शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे:
शहराध्यक्ष : महेश टेळेपाटील (न्यूजमेकर. लाईव्ह)
कार्याध्यक्ष : विजय रणदिवे (सुदर्शन टीव्ही)
कार्याध्यक्ष : पराग डिंगणकर (पीपीसी न्यूज )
उपाध्यक्ष : नागेश होनमाने (झुमॲान न्यूज)
उपाध्यक्ष : संतोष गाजरे (दैनिक लोकमत)
संपर्क प्रमुख : लहु पारवे (जनसुराज्य), प्रशांत नाईक उर्फ स्वर प्रशांत (कलाकार वार्ता)
महिला संपर्क प्रमुख : मंजुषा अवलकंठे (विश्वभारती)
सरचिटणीस : दिनेश वढणे (आयएनएस)
संघटक : शिवाजी हुलावळे (छत्रपती न्यूज), रामचंद्र कुंभार (संध्या न्यूज)
सचिव : रोहित दळवी (द आधुनिक केसरी)
मिडिया प्रचार प्रमुख : धारा इंगोले
सल्लागार मंडळ : धनराज गरड (युवा संवाद)
प्रसिद्धी प्रमुख : अतुल येवले

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

शहर कार्यकारिणी सदस्यपदी खालील सदस्यांची निवड झाली: विनोद पडेलकर (न्यूजमेकर.लाईव्ह), हरिश दंडाले (पीपीसी न्यूज), हनुमंत टेळे (उनाड न्यूज), प्रशांत जंगम (डिजिटल न्यूज, पुणे).

कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांचा परिचय देताना सांगितले की, “डिजिटल पत्रकारितेचा सन्मान राखण्यासाठी आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी ही संघटना कायमच सजग राहील.” अध्यक्ष गणेश हुंबे आणि प्रशांत साळुंखे यांनीही नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. या निमित्ताने उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधत आगामी काळात पत्रकारांच्या समस्यांवर एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

कार्यक्रमाच्या शेवटी महेश टेळेपाटील यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि सांगितले की, “पद हे केवळ भूषवण्यासाठी नसून, ते जबाबदारीने पार पाडण्यासाठी असते. आपण सर्वांनी एकजुटीने पत्रकारांच्या हितासाठी काम केले पाहिजे.”

हा कार्यक्रम केवळ संघटनेचा औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर एकता, समन्वय आणि पत्रकारांच्या आत्मसन्मानाचा संदेश देणारी महत्वपूर्ण घडामोड ठरली.