एफटीआयआय आणि महाराष्ट्र सांस्कृतिक महामंडळामध्ये करार; राज्यात चित्रपट व मीडिया कौशल्यविकासाला चालना

0
23

देशातील आघाडीच्या चित्रपट संस्था एफटीआयआय (फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया), पुणे आणि महाराष्ट्र फिल्म, स्टेज आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (MFSCDCL), मुंबई यांच्यात चित्रपट, मीडिया व मनोरंजन क्षेत्रातील कौशल्यविकास वाढवण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

सोमवारी झालेल्या या करारावर एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह आणि MFSCDCLच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे-पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, एफटीआयआयचे अध्यक्ष आर. माधवन, तसेच सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खर्गे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र ‘क्रिएटर्स इकॉनॉमी’साठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केंद्रबिंदू होण्याच्या मार्गावर आहे. या करारामुळे दूरदूरच्या भागातील लोकांना व्यावसायिक संधी व प्रशिक्षण मिळेल.”

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, गोरगाव, कोल्हापूर, प्रभादेवी आणि कर्जत येथील MFSCDCLच्या केंद्रांवर हे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जाणार आहेत.

एफटीआयआय अध्यक्ष आर. माधवन म्हणाले, “लहान शहरांतील कलाकार आधीच राष्ट्रीय पातळीवर नाव कमावत आहेत. आता स्थानिक कथा जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्यासाठी या करारामुळे अधिक संधी निर्माण होतील.”

विकास खर्गे यांनी सांगितले की, प्रारंभिक टप्प्यात चित्रपटनिर्मिती, सिनेमॅटोग्राफी, डिजिटल प्रोडक्शन, एआय टूल्स, डबिंग, व्हॉइसओव्हर यांसारख्या कौशल्यांवर भर देणारे अभ्यासक्रम राबवले जातील.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय