कसारसई धरणात १९ वर्षीय तरुण बुडून मृत्यू; २४ तासांनी सापडला मृतदेह

0
23

रविवारी सकाळी फिरायला गेलेल्या पाच मित्रांच्या सहलीचा दुर्दैवी अंत झाला, कारण कसारसई धरणात पोहत असताना १९ वर्षीय संतोष शहाजी राऊत या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तब्बल २४ तासांच्या शोधमोहीमेअंती सोमवारी त्याचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संतोष राऊत हा मूळचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील असून सध्या चिखली येथील साने कॉलनीत वास्तव्यास होता. तो आकुर्डीतील एका खासगी जिममध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत होता.

रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास, संतोष राऊत आपल्या चार मित्रांसह कसारसई धरण परिसरात गेला होता. पाण्यात पोहत असताना, त्यांच्या ग्रुपमधील तीन जण पाण्यात अडकल्याने बुडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यापैकी दोन जणांनी कसंबसं आपले प्राण वाचवले. मात्र, संतोष राऊत खोल पाण्यात गेला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिली.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

सोमवारी, शिवदुर्गा रेस्क्यू टीम (लोणावळा) आणि वन्यजीव बचाव संस्थेच्या मावळ संस्था यांच्या सहकार्याने २४ तासांच्या अथक शोधमोहीमेअंती मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.