जुनी कार विकतायची आहे? या आवश्यक कागदपत्रांची खात्री करा, मिळेल मनासारखा भाव

0
18

जर तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल, तर केवळ गाडी चांगल्या स्थितीत असणं पुरेसं नाही, तर तिच्याशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रं पूर्ण आणि उपलब्ध असणं तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य कागदपत्रं हाताशी असतील, तर कारचा व्यवहार केवळ सुरळीतच होत नाही, तर तुम्हाला तुमच्या कारचा मनासारखा दर मिळण्याचीही शक्यता अधिक असते.

चला, बघूया कार विकताना कोणती कागदपत्रं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे:
१. वाहनासंबंधीची कागदपत्रं

  • नोंदणी प्रमाणपत्र (RC): भारतात मोटार वाहन कायद्यानुसार (1988), कोणतंही वाहन विकताना नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे दस्तऐवज सिद्ध करतो की गाडी तुमच्या नावावर नोंदणीकृत आहे आणि तुम्ही तिचे कायदेशीर मालक आहात.
अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

टीप: जर RC हरवली असेल किंवा चोरीला गेली असेल, तर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर करून फॉर्म 26 भरून तुम्ही तिची डुप्लिकेट कॉपी मिळवू शकता.

  • प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC): हे दाखवतो की गाडीचे धुराचे प्रमाण सरकारच्या निकषांनुसार आहे. गाडी विकताना हा कागद अत्यावश्यक आहे आणि जवळच्या पेट्रोल पंपावरून मिळवता येतो.
  • गाडीचा विमा (Insurance): RTO गाडीची मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया केवळ विमा असतानाच स्वीकारतो. त्यामुळे चालू विमा पॉलिसी असणं आवश्यक आहे.
  • ऐच्छिक कागदपत्रं: व्हेइकल बिल, मॅन्युअल, सर्व्हिस रेकॉर्ड इ. जर तुमच्याकडे असतील, तर ते विकत घेणाऱ्याचा विश्वास अधिक दृढ करतात आणि व्यवहार सुलभ करतात.
अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

२. ओळख पडताळणीसाठी कागदपत्रं

  • पॅन कार्ड: आर्थिक व्यवहारांमध्ये आणि मालकी बदलाच्या प्रक्रियेसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.
  • पत्त्याचा पुरावा: स्व-सत्यापित आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, वीज बिल यांपैकी कोणताही दस्तऐवज पत्त्याच्या पडताळणीसाठी ग्राह्य धरला जातो.

३. आरटीओशी संबंधित कागदपत्रं

  • फॉर्म 28 (NOC): नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे, जे दर्शवतो की वाहनाच्या हस्तांतरणास कोणताही आडथळा नाही.
  • फॉर्म 29: या फॉर्मद्वारे आरटीओला कळवायचं असतं की गाडी तिसऱ्या व्यक्तीला विकली गेली आहे. दोन प्रती आवश्यक असतात.
  • फॉर्म 30: फॉर्म 29 नंतर विक्रेत्याने हा फॉर्म भरून आरटीओला तातडीने मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास सांगणं आवश्यक असतं.
अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!