धम्मदिप सांस्कृतिक कलामंचच्या वतीने गरजू विध्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूंचे वाटप

0

बदलापूर दि. १५ (विनोद धोत्रे) सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहून सामजिक बांधिलकी जपणारी दापोली तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणजे धम्मदीप सांस्कृतिक कलामंच, सर्वच क्षेत्रातील सर्वच स्तरातील गरजू, उद्यमी व होतकरू लोकांच्या पाठीशी उभी राहून त्यांना आधार देण्याचे महत्कार्य धम्मदीप सांस्कृतिक संस्थेच्या वतीने नेहमीच करण्यात येते त्याच अंतर्गत बदलापूर मुळगाव येथील गरीब, गरजू व शिक्षणाची कास धरणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य, वह्या, पुस्तके, दप्तर, छत्री यांचे मोफत वाटप संस्थेचे अध्यक्ष अरविंद रुके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

सदर प्रसंगी अध्यक्ष अरविंद रूके , उपाध्यक्ष विनोद धोत्रे, उपाध्यक्ष दिनेश सावंत, सरचिटणीस अमरदिप जाधव, सहचिटणीस नितेश कासारे, कोषाध्यक्ष संगम जाधव, विनोद रूके (बोंडीवली) आदी मान्यवर उपस्थित होते त्या सर्वांच्या उपस्थितीत शालेयपयोगी वस्तूंचे वाटप करून आपण निसर्गाचे देणे लागतो या उदात्त विचारातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही सर्वांच्या उपस्थितीत पार पडला.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

सदर प्रसंगी अध्यक्ष अरविंद रुके यांनी सर्वाना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले व सदर कार्यक्रमास आर्थिक सहाय्य करून योगदान देणाऱ्या सर्व दानी व्यक्तींचे मनापासुन आभार व्यक्त केले, तसेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, शालेय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ तसेच विनोद धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सागर जाधव यांचे विशेष आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.