अभिनेता अजय देवगनच्या ‘Drishyam’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागावर काम सुरू झाले असून, ‘Drishyam 3’ ची शूटिंग ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी सांगितले की, चित्रपटाची स्क्रिप्ट जवळपास अंतिम टप्प्यात असून, हिंदी, मल्याळम आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये एकाच वेळी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
चित्रपटाचे कथानक तिन्ही भाषांमध्ये सारख्याच धाटणीचे असेल, मात्र स्थानिक प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन काही बदल केले जातील. हिंदीमध्ये अजय देवगन, मल्याळममध्ये मोहनलाल आणि तेलुगूमध्ये वेंकटेश मुख्य भूमिकेत असतील.
चित्रपटात पुन्हा एकदा सस्पेन्स आणि इमोशनचा मेळ असेल, अशी माहिती दिग्दर्शकांनी दिली. प्रेक्षकांचा उत्साह लक्षात घेता, तिन्ही वर्जन एकाच दिवशी प्रदर्शित करून स्पॉयलर टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘Drishyam’ ही फ्रँचायझी 2013 मध्ये सुरू झाली होती आणि यापूर्वीचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे ‘Drishyam 3’ कडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.