NEET UG 2025 परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच काउंसिलिंग प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे. देशभरात यंदा 1,18,190 MBBS जागांवर प्रवेश घेतला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, देशातील सर्वात पहिले वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या कोलकाता मेडिकल कॉलेज विषयी माहिती पुढे आली आहे.
हे महाविद्यालय 28 जानेवारी 1835 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केले होते. येथे एकूण 250 MBBS जागा असून, त्यापैकी 38 जागा ऑल इंडिया कोट्यातून आणि 212 जागा राज्य कोट्यातून भरल्या जातात.
या कॉलेजमध्ये MBBS कोर्ससाठी एकूण ट्यूशन फी ₹40,500 आहे, तर हॉस्टेल फी ₹648 वार्षिक आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये जनरल कोट्यासाठी कट-ऑफ रँक 3427 होती. यंदा 2025 मध्ये जनरल कोट्यासाठी कट-ऑफ 610 ते 630 गुणांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, वाय-फाय, खेळाचे मैदान, जिम आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध सुविधा या महाविद्यालयात उपलब्ध आहेत. कोलकाता मेडिकल कॉलेजचा परिसर सुमारे 26 एकरांवर पसरलेला आहे. देशातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह वैद्यकीय शिक्षण केंद्र म्हणून या कॉलेजची ओळख आहे.