MPSC परीक्षांसाठी आधार आधारित KYC अनिवार्य; बनावट उमेदवारांवर लगाम

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा अर्ज प्रक्रियेसाठी आधार आधारित केवायसी (KYC) प्रक्रिया १५ जुलैपासून सक्तीची करण्यात आली आहे. आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे बनावट उमेदवारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

या निर्णयानुसार उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी ऑनलाईन प्रणालीतून आपली ओळख आधार क्रमांकाच्या माध्यमातून पडताळावी लागणार आहे. केवायसी पूर्ण न केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. यापुढे प्रत्येक उमेदवाराला केवळ एकच खाती वापरण्याची परवानगी असून, एकाहून अधिक खाती आढळल्यास ती निष्क्रिय करण्यात येणार आहेत.

आधार क्रमांकासोबत जोडलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी देणे बंधनकारक असून, प्रवेशपत्र व परीक्षेच्या दिवशीही आधार पडताळणी केली जाणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

परीक्षार्थी आणि शैक्षणिक तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, परीक्षेचे वेळापत्रक नियमित ठेवावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.