महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (MAH CET Cell) BBA, BCA, BBM आणि BMS या पदवीपूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी MAH CET 2025 परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही मुदतवाढ विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद लक्षात घेऊन करण्यात आली आहे.






पूर्वी परीक्षा कधी झाली होती?
यावर्षी नियमित MAH CET परीक्षा २९ आणि ३० एप्रिल रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ७२,२५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, मात्र त्यापैकी फक्त ६१,६६६ विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. त्यामुळे राज्यातील अनेक कॉलेजांमध्ये जास्त प्रमाणात जागा रिकाम्या राहिल्या आहेत.
निर्णयाचे कारण काय?
विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांकडून रिकाम्या जागांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर ही अतिरिक्त CET घेण्याचा आणि अर्जाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अतिरिक्त CET कधी होणार?
- परीक्षेची तारीख: १९ आणि २० जुलै २०२५
- परीक्षेचा प्रकार: ऑनलाइन
- अभ्यासक्रम, गुणदान पद्धत आणि स्वरूप हे नियमित परीक्षेसारखेच असणार आहे.
प्रवेशपत्र कधी मिळेल?
- प्रवेशपत्र लवकरच CET च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
- उमेदवारांना आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून प्रवेशपत्र आणि परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती मिळवता येईल.











