लीड्समध्ये जाताना सचिन तेंडुलकरने केली चूक, पोलिसांनी रस्त्यात थांबवून केली चौकशी

0

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये लीड्स शहर चर्चेचा विषय ठरलं आहे. लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियममध्ये २० जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. मैदानावरील रेकॉर्ड्सपेक्षा लीड्सशी संबंधित एक जुनी आणि मजेशीर घटना मात्र आजही लक्षवेधी ठरते – ती म्हणजे सचिन तेंडुलकरला पोलिसांनी रस्त्यात थांबवलेली घटना.

ही घटना १९९२ साली घडली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर इंग्लंडमध्ये यॉर्कशायर काउंटी क्लबसाठी खेळत होता. लीड्स हे यॉर्कशायर प्रांतातच येतं. सचिनने एका प्रमोशनल मुलाखतीदरम्यान गौरव कपूर सोबत ही आठवण शेअर केली होती.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सचिन तेंडुलकर आणि माजी क्रिकेटपटू जतिन परांजपे एकत्र न्यूकॅसलमध्ये एक प्रदर्शनी सामना खेळून लीड्सकडे परतत होते. सचिन यॉर्कशायर क्लबने दिलेल्या कारमध्ये ड्रायव्हिंग करत होता. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अनेक ठिकाणी काम सुरू होतं आणि स्पीड लिमिट ५०-५५ माईल प्रति तास ठेवण्यात आली होती.

सचिनने सांगितले की, त्याने पुढे चाललेल्या एका पोलिस कारमागे गाडी चालवायचा निर्णय घेतला, जेणेकरून योग्य स्पीडमध्ये गाडी चालेल. मात्र काही वेळातच पोलिसांनी त्याला हाताने सिग्नल दिला – जो सचिन समजू शकला नाही. त्याने उलट गाडीची लाईट उजळ केली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पोलिसांनी गाडी थांबवली आणि विचारलं की, “तुम्हाला माझा इशारा समजला नाही का?” सचिन म्हणाला, “मला वाटलं तुम्ही लाईट वाढवण्याचा इशारा करत आहात.” तेव्हा पोलिस म्हणाले, “मी सांगत होतो की स्पीड लिमिट ५० माईल आहे आणि तुम्ही ६० माईल ने चालवत आहात.”

सचिनला लक्षात आलं की, पोलिसांच्या कारची स्पीड मर्यादेपेक्षा जास्त होती आणि त्यामागे चालल्यामुळे त्यांच्याही गाडीचा वेग अधिक झाला. पोलिस अधिकाऱ्याने सचिनच्या कारवर Yorkshire County Cricket Club चा लोगो पाहिला आणि विचारलं, “तुम्ही यॉर्कशरसाठी खेळता का?” सचिन म्हणाला, “हो, मी यॉर्कशायरचा खेळाडू आहे.” पोलिस अधिकाऱ्याने लगेच विचारलं, “तुम्हीच पहिला विदेशी खेळाडू आहात का यॉर्कशरसाठी?” सचिनने होकार दिल्यावर पोलिसांनी त्यांना फक्त तोंडी इशारा दिला आणि कार पुढे जाऊ दिली. कोणताही दंड न करता त्यांनी सचिनला सोडून दिलं.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता