हीरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणं आता सामान्य ग्राहकांसाठी सोपं आणि स्वस्त करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड Vida येत्या महिन्यात आपला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘Vida VX2’ लाँच करणार आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर Battery-as-a-Service (BaaS) म्हणजेच बॅटरी रेंटल प्रणालीसह उपलब्ध होणार आहे.
Battery-as-a-Service (BaaS) म्हणजे काय?
BaaS म्हणजे बॅटरीसाठी वेगळं पैसे भरायची गरज नाही – म्हणजे तुम्ही स्कूटर तर खरेदी कराल, पण बॅटरी भाड्याने घेऊ शकता.
यामुळे स्कूटरची एकूण किंमत कमी होईल. तुम्हाला स्कूटरसाठी एकदम पूर्ण रक्कम भरण्याची गरज नाही. बॅटरीसाठी तुम्ही मासिक भाडं (subscription) भरू शकता.
किती कमी होईल स्कूटरची किंमत?
बॅटरी ही इलेक्ट्रिक स्कूटरमधील सर्वात महाग घटक असते. जर ग्राहकाला ती लगेच खरेदी न करता मासिक भाड्याने मिळाली, तर एकदम मोठा खर्च टळेल.
यामुळे सामान्य ग्राहकांसाठीही इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करणं परवडणार ठरेल.
कधी येणार, कितीचा असेल प्लॅन?
- सब्सक्रिप्शन प्लॅनचे तपशील 1 जुलै 2025 रोजी जाहीर केले जातील.
- ग्राहक बजेट आणि वापराच्या आधारावर विविध प्लॅन निवडू शकतील.
- कंपनीने स्कूटरची किंमत, बुकिंग व डिलिव्हरीबाबत अजून अधिकृत माहिती दिलेली नाही.
Vida VX2 चे खास फीचर्स (लीकनुसार):
- छोटं TFT डिस्प्ले, आधुनिक स्विचगियर
- अॅलोय व्हील्स
- 3600 फास्ट चार्जिंग स्टेशन आणि 500 सर्विस सेंटर – 100+ शहरांमध्ये
स्पर्धक कोण?
Vida VX2 ची टक्कर खालील स्कूटर्सशी होऊ शकते:
- Bajaj Chetak 3001
- TVS iQube
- Ola S1 Air