गंगाधाम चौकातील भीषण अपघात : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली घटनास्थळाची पाहणी

0

मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम चौकात बुधवारी (११ जून) सकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका २९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुणेकरांत संतापाची लाट उसळली आहे. अपघाताची गंभीरता लक्षात घेता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

अपघाताची घटना
ही दुर्दैवी घटना सकाळी ११:१५ वाजता घडली. दिपाली युवराज सोनी (वय २९) या त्यांच्या सासऱ्यांसोबत दुपारी मुलीच्या शालेय साहित्याची खरेदी करून घरी परतत असताना, सिग्नल हिरवा होताच गाडी वळवत असताना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर सासरे जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही गंगाधाम चौकातील शनैश्वर बंगला, झळा कॉम्प्लेक्ससमोर येथे राहणारे होते.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पोलिसांची कारवाई
मार्केटयार्ड पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण शोधले जात असून चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेमुळे काही काळासाठी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

आयुक्तांची पाहणी आणि नागरिकांचा रोष
घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगाधाम चौकाची पाहणी केली. त्यांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. आयुक्तांनी स्पष्ट केले की, “गेल्या तीन वर्षांत या चौकात तीन मोठे अपघात झाले आहेत, त्यामुळे आता वाहतूक आणि सुरक्षा यंत्रणेमध्ये बदल करण्याची गरज आहे.”

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पुणे शहरात अवजड वाहनांवर बंदी असूनही प्रवेश?
अपघाताचा आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे शहरात अवजड वाहनांना बंदी असूनही अशा वाहनांची मुक्तपणे ये-जा सुरू आहे. नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून पोलीस प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा आहे.