वैष्णवीची आत्महत्या की हत्या? ‘त्या’ 3 वस्तू संशयाची सुई स्थिरावली, हगवणे कुटुंबाच्या अडचणी वाढणार!

0
3

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. हुंड्यांच्या मागणीसाठी छळ होत असल्याच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले. तर, दुसरीकडे तिच्या पालकांनी ही आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप केला. या प्रकरणात पोलिसांनी खोलवर तपास सुरू केला आहे. तपासा दरम्यान पोलिसांचा संशय एका वस्तूवर अधिक बळावला आहे. वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वैष्णवीच्या शरीरावर जखमा…

शवविच्छेदनानुसार, वैष्णवीच्या शरीरावर तब्बल 29 जखमा आढळल्या असून त्यातील 15 जखमा तिच्या मृत्यूपूर्व 24 तासांत झाल्या होत्या. त्याशिवाय, वैष्णवीला तिच्या मृत्यूच्या 5-6 दिवस आधीपासून तिला मारहाण करण्यात येत असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

आत्महत्येचा उलगडा होणार? त्या गोष्टीवर संशय…

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता तपास अधिक खोलवर होत आहे. घटनास्थळी असलेल्या बेडरूममधील पंख्यावर संशयाची सुई स्थिरावली आहे. १६ मे रोजी भुकूम येथील एका फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेल्या वैष्णवीच्या मृत्यूमागे आत्महत्या की घातपात, याबाबत संशय बळावत चालला आहे.

वैष्णवीने साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्या पंख्याच्या फिटिंग आणि ताकद याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी पंखा आणि वापरलेली साडी यांना तातडीने काढून फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले आहे.

पंख्याच्या तपासणीदरम्यान पोलिसांना त्याच्या फिटिंगमध्ये ढिलाई, स्क्रूजच्या घासट्याचे पुरावे आणि मेटलच्या कमकुवत भागांची माहिती मिळाली. अशा स्थितीत एखादी व्यक्ती त्या पंख्याला लटकून गळफास घेऊ शकते का, यावर संशय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर फॉरेन्सिक अहवाल अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप