कौंढर काळसूर गावची सुकन्या पूनम मोहिते हिची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत निवड

0
2

गुहागर दि. ३० (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, गिमवी विभाग क्र. ३, शाखा क्र. ३१ चे सभासद तसेच माजी विभाग अधिकारी दिवंगत संजय अनंत मोहिते यांची सुकन्या पूनम संजय मोहिते हिची बालेवाडी, पुणे येथे होत असलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत निवड झाली असून १९ वर्षीय खालील रत्नागिरी जिल्हा रग्बी संघाचे ती नेतृत्व करणार आहे.

कु. पूनम संजय मोहिते हिला लहानपणापासूनच रग्बी खेळात विशेष रुची असून लहानपणापासूनच तिने रग्बी खेळाचे प्राथमिक धडे गिरवले आहेत तिचे वडील दिवंगत संजय अनंत मोहिते हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असून त्यांनी आपल्या मुलीच्या सुप्तगुणांना नेहमीच वाव दिला परंतु त्यांच्या अचानक मृत्यूनंतर पूनम ने खचून न जाता वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून क्रीडाक्षेत्रात अफाट व अविरत मेहनत घेतली ज्याच्या फलस्वरूप आज तिची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली असून ती रत्नागिरी जिल्हा संघाचे नेतृत्व ही करणार आहे.2

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

कु. पूनम संजय मोहिते हिने अपार जिद्द व मेहनतीने सराव अविरत सुरू ठेवला त्यामुळेच तिची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत निवड झाली आहे असे कौंढर काळसूर वासीयांचे म्हणणे आहे त्यामुळे बौद्धजन सहकारी संघ, गिमवी विभाग क्र. ३, शाखा क्र. ३१ (गाव व मुंबई शाखा) व समस्त कौंढर काळसूर गावच्या ग्रामस्थांकडून कु. पूनम संजय मोहिते हिच्यावर पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.