पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने मांजरीत पहाणी दौरा

0

पावसाळा आणि वळवाच्या पावसामुळे मांजरी बु. परिसरात ठिकठिकाणी रस्ता, ड्रेनेज लाईन इत्यादींची झालेली दुरावस्था तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी झेड कॉर्नर आदी ठिकाणी पावसाळी चेंबर बनविणे, पाण्याच्या टाकीवरील धोकादायक रेलिंग काढणे, बरदडी पुलाखाली पावसाचे पाणी साठत असल्यामुळे वाहतूक बंद होऊन जाते.

यावरील तातडीची उपायोजना तसेच घुले नगर लेन नं -२, घुले नगर लेन नं -४, अशोका पार्क घावटे नगर, गायरान वस्ती रेल्वे पूल, मांजराई नगर इत्यादी ठिकाणी होत असलेली सांडपाणी वहन व्यवस्था सक्षमीकरणाकरिता हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे, उप अभियंता नितीन कळमकर, सुनील पाटील, कनिष्ठ अभियंता मयूर जाधव शासन नियुक्त नगरसेवक अजित घुले, अमर घुले, मयुर खलसे, बाळासाहेब घुले, यांच्या उपस्थितीत रविवार (दि.25 ) संयुक्त पाहणी करण्यात आली. येत्या आठवडा पंधरवड्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार