राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणे यांना अशी अटक; सीसीटीव्हीत दिसले अन् पोलिसांनी सापळा रचला

0
2

पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अखेर अटक झाली आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शंशाक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना यापूर्वीच अटक झाली होती. वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी मुलीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानंतर १७ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता.

असा रचला सापळा

वैष्णवी हिचे लव्ह मॅरेज होते. घरच्या मंडळीचा विरोध असताना तिच्या हट्टामुळे शंशाकसोबत लग्न लावून दिले. लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि इतर अनेक गृहउपयोगी वस्तू दिल्या होत्या. त्यानंतरही तिचा हुंड्यासाठी छळ होत होता, असे वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी म्हटले. या प्रकरणात १७ मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना अटक झाली होती. परंतु सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. गुरुवारी मावळ तालुक्यातील तळेगाव येथे एका हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये ते दिसले. राजेंद्र हगवणे मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरुन सुशील निघून गेला. पोलिसांना ही माहिती समजाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली. संपूर्ण परिसरात झडती घेतली. अखेर शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

पोलिसांनी वाढवली होती पथके

पोलिसांनी दोन दिवसांत वेगाने तपास सुरु केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बारामती येथील सभेतच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक होईल, असे सांगितले होते. त्यासाठी पोलिसांची पथके वाढवल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. दरम्यान, वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी दोघांना अटक केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले आहे. उशीर झाला, पण आता आमच्या मुलीस न्याय मिळावा. या लोकांना मोक्का लावून, फाशी दिली पाहिजे, अशी मागणी मोहन कस्पटे यांनी केली आहे. हगवणे कुटुंबातील मोठी सुन मयुरी हिनेही गुरुवारी तिचा छळ झाल्याची माहिती दिली होती.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल-

कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन निलेश चव्हाणच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मे रोजी वैश्नवीच्या माहेरचे लोक तीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वे नगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हीसकाऊन लावले होते‌ . कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. वैश्नवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दीली. मात्र पोलीसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय. निलेश चव्हाण हा वैनवीचा नवरा शशांक आणि वैश्नवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र आहे.

नेमकं प्रकरण काय?

संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकऱणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केलीय. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशीललाही अटक झालीय. वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केलीय. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झालीय. वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे