राज्यात २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण; लातूरच्या विद्यार्थ्यांची बाजी

0

राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात तब्बल २११ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे. यंदा शंभर टक्के गुण मिळविणारे ११३ असे सर्वाधिक विद्यार्थी लातूर विभागात आहेत. तर राज्यातील ८१ हजार ८०९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत जवळपास १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते, त्यात लातूर विभागातील १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते.

यंदा राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-१३, नागपूर- ०३, छत्रपती संभाजीनगर-४०, मुंबई- ०८, कोल्हापूर-१२, अमरावती-११, नाशिक- ०२, लातूर-११३ आणि कोकण- ०९ विद्यार्थ्यांना विभागीय मंडळात १०० टक्के गुण मिळाले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

तब्बल २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के

३५ टक्के गुण मिळविणारे विभागनिहाय विद्यार्थी :

पुणे-५९, नागपूर- ६३, छत्रपती संभाजीनगर- २८, मुंबई-६७,

कोल्हापूर-१३, अमरावती-२८, नाशिक-०९, लातूर- १८, कोकण-००