तासाभराच्या पावसाने पुणे जलमय, रस्ते पाण्यात; पुणेकर वाहतूक कोंडी अडकले

0
1

फक्त एक तासाच्या पावसानंतर पुण्यातील बहुतांश भागात पाणी साचलं आहे. तासाभराच्या पावसाने जर पुणे जलमय होत असेल तर पुन्हा महापालिकेच्या कामावर संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी सायंकाळी आणि मंगळवारी दुपारी झालेल्या पावसानं शहराती अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. कोथरूड, सिंहगड रस्ता, बाणेर-बालेवाडी, नऱ्हे या भागात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असून वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पावसामुळे शहरात वाहतुकीची मोठी कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. दुपारी सुरू असलेल्या पावसाने पाणी साचल्यानंतर वाहतूक मंदावली आहे. दुपारी १ ते ४ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जर सध्या सुरू असलेला पाऊस असाच पडत राहिला तर सायंकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेत वाहतुकीची कोंडी आणखी वाढ झाली आहे. यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

यंदाही पावसाळ्याआधी ड्रेनेज व गटारी स्वच्छता, खड्डे बुजविण्याची कामे महापालिकेनं पूर्ण केली नसल्याचं दिसून येतंय. यामुळे पहिल्या पावसातच शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय. शहरात विविध ठिकाणी सुरू असलेली मेट्रोची कामे, रस्त्यांची कामे यामुळे आधीच रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच अपूर्ण काम आणि उघड्या गटारांमुळे पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात ढगाळ हवामान आहे. सोमवारीही संध्याकाळी पुण्यात पावसाने हजेरी लावली होती. मंगळवारी पुणे शहरातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.