भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानचे डीजीओमओ यांची दुपारी चर्चा होणार होती. मात्र या चर्चेची वेळ पुढे ढकलण्यात आली होती आणि ही चर्चा संध्याकाळी पूर्ण झाली.






हॉटलाईनवरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या DGMO नी एकमेकांशी चर्चा केली. यावेळी पाकिस्तान काहिसा नरमला असल्याचे पाहायला मिळाले तर यापुढे कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही, अशी मोठी ग्वाही यावेळी दोन्ही देशांच्या DGMO च्या चर्चेवेळी पाकिस्तानकडून देण्यात आली. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या DGMO च्या चर्चेंदरम्यान पीओके, दहशतवादाच्या मुद्द्याशिवाय इतर कोणतीही चर्चा होणार नसल्याचे सांगण्यात आले होते.











