भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर तणाव सुरुच आहे. जम्मू-श्रीनगरपासून पठाणकोट आणि पोखरण पर्यंत पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. परंतु, भारताने पाकिस्तानचे ड्रोन्स निकामी केले आहेत. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या 26 शहरांवर हल्ला केला. भारतानेही पाकिस्तानचे मनसुबे उधळून टाकत प्रतिहल्ला केला. याच पार्श्वभूमीवर भारताने 32 विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डॉनॉल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या वाढत्या तणावामुळे चिंता व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग CDS आणि तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
जम्मू काश्मीरच्या सीमेवरून मोठी कारवाई
भारतीय सेनेकडून सर्जिकल स्ट्राईक सुरु करण्यात आलं आहे. संरक्षण खात्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मू सीमेवरून भारतीय सेनेनं पाकिस्तानचे पोस्ट्स आणि दहशतवादी लॉन्च पॅड्स उडवून टाकले आहेत. याठिकाणी ट्यूब ड्रोनही लॉन्च केलं जातं.