मुरीदकेत मोठा दहशतवादी ठार? अंत्ययात्रेत ‘तो’ लष्कर कमांडर सामील! सैनिक वरिष्ठ पोलीस अधिकारीही सामील

0
2

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके आणि बहावलपूरसारख्या दहशतवादी ठिकाणांवर टार्गेट केलं. या हल्ल्यात लष्कर-ए-तयब्बाचे अनेक दहशतवादी मारले गेले. पाकिस्तान मीडियाच्या हवाल्याने एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लष्कर-ए-तयब्बाचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारच्या विधीच्या कार्यक्रमात सामील झाल्याचं समोर आलंय.

दहशतवादांच्या अंत्ययात्रेत लष्कर-ए-तयब्बाचा टॉप कमांडर सामील

लष्कर-ए-तयब्बाचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रौफ भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सामील झाला होता. त्याने अंत्यसंस्कारात नमाज वाचलं. यावेळी पाकिस्तानचे सैनिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही सामील झाले होते. लष्कर-ए-तयब्बाचा टॉप कमांडरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

यावरून हे स्पष्ट होतंय की, भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांचं समर्थन करतं, असंही यावरून स्पष्ट होतंय.भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि चीनसह अनेक देशातील राजकारण्यांना पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे.

भारताने सांगितलं की, सुरक्षेच्या दृष्टीने हा हल्ला महत्त्वपूर्ण होता. या कारवाईत बहावलपूरमध्ये दहशतवादी मसूद अजहरचा उड्डा उद्ध्वस्त झाला आणि मुरीदकेमधील लष्करचं मुख्यालयंही उडवून टाकलं. हा हल्ला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी होता. पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला नाही. तेथील नागरिकांवर हल्ला करण्यात आला नाही, असं भारतानं म्हटलं आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य