





हडपसर मध्ये जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत
पुणे (प्रतिनिधी) : तब्बल साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून राजमाता जिजाऊ रथयात्रा हडपसरच्या भागात यात्रा आली ज्या ज्या भागातून ही रथयात्रा गेली त्या त्या भागात राजमाता जिजाऊंचे प्रभावशाली विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम झाले असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केले.
मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान यात्रा हडपसर गाडीतळ येथे आली. यावेळी विविध सामाजिक – राजकीय संघटनासह जिजाऊ प्रेमी नागरिकांच्या कु.प्रगती महेश टेळेपाटील यांच्या वतीने जिजाऊ वंदना आणि माजी महापौर प्रशांत जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या हस्ते रथयात्रेचे स्वागत झाले. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, योगेश ससाणे, उमाकांत उफाडे, प्रा.अर्जुनराव तनपुरे, संतोष शिंदे, चंद्रशेखर घाडगे, अविनाश मोहिते, ज्योतिबा नरवडे, सिद्धार्थ कोंढाळकर, डॉ.पवार सर, प्रशांत घुले, मोहन चिंचकर, शोभाताई लगड, विशाल येवले, अविनाश काळे, संदीप मोरे, प्रणव मोरे, डॉ.शंतनू जगदाळे, आबासाहेब मोहिते, डॉ.स्वप्नील भाडळे, डॉ.प्रसाद जोगदंड, अनिल मोरे, तुषार पायगुडे, अविनाश काळे, बबन जगताप, प्रमोद कोद्रे, आयुब पठाण, डॉ.बच्चूसिंग टाक, नाझीम शेख, नय्युम पटेल, स्मिता गायकवाड, मीना थोरात, नितीन आरू, सतीश भिसे, किरण गाडेकर यांच्यासह जिजाऊ – सावित्री – अहिल्या – रमाई, शिव – फुले – शाहू – आंबेडकर प्रेमीं नागरिकांसह राजकीय – सामाजिक संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमंत्रक म्हणून मराठा सेवा संघ,
मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान, स्वर्गीय अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान, जनस्वराज्य फाउंडेशन, मिलिंद बुद्ध विहार, मराठा टायगर फोर्स, धनगर उन्नती मंडळ,पथारी पंचायत, शिवप्रहार संघटना, सिद्धार्थ बुद्ध विहार, अखिल भारतीय म. फुले समता परिषद, परिवर्तन महिला आधार केंद्र, जिगरबाज मावळा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंच आदी सामाजिक संघटनाचा पुढाकार घेतला होता.
रघुवीर तुपे, महेश टेळेपाटील, अनिल बोटेपाटील, रमजान शेख, संदीप लहाने पाटील, अतुल येवले, लहू पारवे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा संविधान प्रस्तावना प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप लहानेपाटील यांनी तर रमजान शेख यांनी आभार मानले.











