मॉडर्न विकास मंडळ, पुणे आयोजित ३५व्या भव्य रक्तदान शिबिराची जोरदार तयारी सुरू

0

कोथरूड भागात कायमच समाज उपयोगी उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान म्हणून नावारुपास आलेल्या मॉडर्न विकास मंडळ पुणे चा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या ‘रक्तदान शिबिर’ उपक्रमाचे यंदाचे पण 35 वे वर्ष असून निर्णय टप्प्यावर या नियोजनामध्ये कमालीचा उत्साह असून कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 12 व प्रभाग क्रमांक 11 मधील रक्तदात्यांसाठी आवाहात्मक फलक, व्हाईस कॉल बल्क sms अन् व्हाट्सअप च्या माध्यमातूनही आव्हान करण्यात येत आहे. गुरुवार दि. १ मे २०२५ रोजी सकाळी ८ ते २ वा. दरम्यान गोकुळ सभागृह शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पुणे शहरातील सध्या वाढते तापमान लक्षात घेता यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करताना रक्तदात्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली असून कोणत्या नागरिकांना त्रास झाल्यानंतर काळजी घेण्यासाठी विशेष डॉक्टरांचे पथकही नियुक्त करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.प्रकाशजी जावडेकर

(माजी केंद्रीय मंत्री) व मा. ना. श्रीमती माधुरीताई मिसाळ (पर्यावरण, नगरविकास राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) निमंत्रित आहेत. तर प्रमुख उपस्थितीत म्हणून मा. धीरजजी घाटे (शहराध्यक्ष, पुणे भा.ज.पा.) मा. राजेशजी पांडे महामंत्री, (भाजपा महाराष्ट्र प्रदेश) मा. रविजी अनासपुरे (कार्यालयीन मंत्री, महाराष्ट्र भाजपा) मा. अंकीतजी काणे (संपादक, मल्टिमिडीया सकाळ माध्यम समूह), मा. प्रविणजी बडेकर (प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक) व मा. सौ. मोनिकाताई मोहोळ (मा. नगरसेविका, पुणे म.न.पा.) मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

पुणे शहरात सामाजिक जबाबदारी म्हणून मॉडर्न विकास मंडळ, पुणे विविध उपक्रम राबवत असते. गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान आरोग्य पथक, लहान मुलांच्या कलागुणांना देण्यासाठी विविध उपक्रम महिलांच्या आरोग्यविषयक विविध शिबीर आयोजित करत असली तरी रक्तदान शिबिर हे संस्थेचा एक सर्वोच्च उपक्रम आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा तरुणांचा साहिल प्रतिसाद लाभत राहिला आहे तरी 35 व्या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ही अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला व कार्याध्यक्षा सौ. मनिषा बुटाला यांनी केले आहे.