राजस्थान रॉयल्सने 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने केलेल्या ऐतिहासिक शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सवर 8 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. गुजरातने राजस्थानला विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होत. राजस्थानने हे आव्हान वैभवच्या वादळी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं
राजस्थानने 25 बॉलआधी आणि 2 विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि एकतर्फी विजय मिळवला. राजस्थानने 15.5 ओव्हरमध्ये 212 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल यानेही विजयात योगदान दिलं. यशस्वीने नाबाद 70 धावा केल्या. तर कर्णधार रियान परागही 32 धावावंर नाबाद परतला. राजस्थानचा हा सलग पाचव्या पराभवानंतर पहिला तर एकूण तिसरा विजय ठरला.