संपूर्ण देश शोकसागरात बुधवारी दुपारी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यावर गोळीबार

0

जम्मू काश्मिर: पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २८ पर्यटकांच्या मृत्यूने अख्खा देश शोकसागरात बुडलेला असताना बुधवारी सर्च ऑपरेशनदरम्यान कुलगाममधील तंगमर्ग येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर गोळीबार केला. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील तंगमर्ग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली आहे. संशयास्पद हालचालींबद्दल विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर, सैन्याने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २८ नागरिकांचे जीव गेले. यात सहा महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश शोकसागरात असताना बुधवारी दुपारी पुन्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

नेमकं काय झालं?

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, असे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येते. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तंगमार्ग भागात गोळीबार सुरू असल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. चिनार कॉर्प्सच्या अधिकृत निवेदनानुसार, या कारवाईत दोन अतिरेकी ठार झाले. २३ एप्रिल २०२५ रोजी, अंदाजे २-३ दहशतवाद्यांनी बारामुल्ला (उत्तर काश्मीरमधील) येथील उरी नाला येथील क्षेत्रातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, असे चिनार कॉर्प्सने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन