श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. विद्यमान संचालक मंडळाच्या वतीने निवडणूक 2024-25 / 2029-30 लढवणाऱ्या श्री रामेश्वर पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ श्री रामेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात करण्यात आला. विश्वासार्ह संचालक मंडळ व पारदर्शी कारभार या तत्त्वावर गेली 32 वर्ष समान संचालक मंडळाने कारभार केल्यामुळे पुन्हा सभासदांच्या पसंतीला श्री रामेश्वर पॅनलच पडेल असा विश्वास यावेळी सर्व उमेदवारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था सभासदांच्या हितार्थ समिती यंदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आले परंतु काही मंडळींनी संस्थेचे हित पाहण्यापेक्षा स्व:हिताला किंमत दिल्यामुळे सभासदांवर ही निवडणूक लादण्यात आली असली तरी सुद्धा मागील 32 वर्षाचा कार्यभार पाहता आगामी निवडणुकीमध्ये सभासदांची पहिली पसंती ही श्री रामेश्वर पॅनलच असून रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी यावरती अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था विद्यमान अध्यक्ष,उपाध्यक्ष, पदाधिकारी, आजी-माजी संचालक, संस्थेचे हितचिंतक, भाग भांडवलदार आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री रामेश्वर पॅनेलच्या सर्वच्या सर्व नऊ उमेदवारांना चिन्ह : कपबशी शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
श्री रामेश्वर पॅनेल अधिकृत उमेदवाराचे नाव-
अनु क्रमांक १ दांगट सचिन दशरथ सर्वसाधारण
अनु क्रमांक २ दांगट विकास पंढरीनाथ सर्वसाधारण
अनु क्रमांक ४ घुले अभिजित सोपान सर्वसाधारण
अनु क्रमांक ५ घुले बाळासाहेब काळुराम सर्वसाधारण
अनु क्रमांक ७ हगवणे बाळासाहेब अर्जुनराव सर्वसाधारण
अनु क्रमांक ८ हगवणे राजेंद्र गणपत सर्वसाधारण
अनु क्रमांक १० लगड देवीदास एकनाथ सर्वसाधारण
अनु क्रमांक ११ मते विलास साधू सर्वसाधारण
अनु क्रमांक १ देवकर राजेश शंकर
(विमुक्त जाती / भटक्या जमाती /विशेष मागास प्रवर्ग)
या सर्व उमेदवारांना ‘कपबशी’ चिन्हावर शिक्का मारून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले तसेच श्री रामेश्वर पॅनलचे बिनविरोध निवडून आलेल्या सौ. विनादेवी विजय मते, सौ. मनीषा भगवान मोरे, श्री, विकास रामदास कोल्हे, श्री. नागेश सोपान शिंदे सभासदांचे हार्दिक अभिनंदनही करण्यात आले.
मतदान : रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत. मतदान स्थळ : गणेश मंगल कार्यालय, नांदेड फाटा, पुणे ४१