भगवान गडाचे महंत नावदेवशास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा, असं महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलं आहे. चांगली वाणी बंद पडली आहे. पहिल्या पदावर येऊन धनंजय मुंडे यांच्या हातून समाजाची सेवा घडावी असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे. तसेच भगवान गडासोबत छेडछाड करू नका असंही ते यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे आता नामदेव शास्त्री यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भगवान बाबा जेव्हा मारतात. तेव्हा त्या काठीचा आवाज येत नाही, असंही नामदेव शास्त्री यांनी यावेळी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले नामदेवशास्त्री?
मी जेव्हा फेटा बांधण्यासाठी गेलो तेव्हा मला फोन आला होता. आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपूत्र धनंजय मुंडे या कार्यक्रमाला येणार होते. ते दोन तास हेलीकॉप्टरच्या शेजारी बसले मात्र त्यांना क्लेअरन्स मिळाला नाही. त्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यांचा दौरा रद्द झाला. मला तर असं वाटतं की जे त्यांच्या गालावरून वारं गेलं आहे, सगळ्यांनी मिळून भगवान बाबांना प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे, ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाजकल्याण त्यांच्या हातानं घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलू या, असं नावदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गडावर सर्वजण एकोप्याने राहतात, आमच्यात खडे टाकू नका, ज्यांचं कल्याण करायचं आहे, त्यांनी या. हा वारकरी संप्रदाय आहे. जातीपातीच्या पलिकडचा संप्रदाय आहे. पण दुसरा शब्द सांगताना सांगून जातो. गडासोबत छेडखानी करू नका, भगवान बाबा जेव्हा पाहातातना तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम असं पाझरतं. पण जेव्हा ते मारतातना तेव्हा त्या काठीचा आवाज येत नाही पण जीवन उद्ध्वस्त होतं. हजारो लोकांनी हे पाहिलेलं आहे, असंही यावेळी नामदेवशास्त्री यांंनी म्हटलं आहे.