श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना नानाकडेच पण ‘ब’ वर्गाकडे विशेष लक्ष; बदललेली गणिते तारेवरची कसरत?

0

मुळशी तालुक्यातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक पार पडल्यानंतर संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांची आज बहुमताने अध्यक्ष पदाची निवड पार पडत असली तरी सुद्धा 21 संचालकांच्या मंडळामध्ये विशेष जिव्हाळ्याची असलेली ब वर्गाची जागा धोक्यात आली आहे की काय अशी चर्चा नव्याने सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांना अपेक्ष प्रमाणे मध्ये न मिळता सुमारे 1000 कमी मिळालेली मते विचारात घेता त्यांच्या पसंतीच्या ब वर्गाच्या जागेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री संत तुकाराम सह. साखर कारखाना संस्थापक चेअरमन विदुराजी उर्फ नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वामध्ये सन २०२५-२०३० करिता संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले असून आज दुपारी 1 वाजता नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नियुक्ती केल्या जाणार आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना पाच तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या नवनियुक्त सदस्यांचा विचार करता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांच्या नियोजनामध्ये माजी माजी आमदार यांच्या संमतीने प्राबल्य तयार करण्यात आले आहे. आपल्या राजकीय वजनाचा वापर करून अत्यंत हुशारीने संस्थापकांच्या ताब्यातून अलगद साखर कारखाना मिळवला ही सुरू झालेली नवी चर्चा प्रत्यक्षात काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील केंद्रीय मंत्री 5 आमदार आणि माजी आमदार विद्यमान खासदार अशी भलीमोठी मांदीयाळी असतानाही सर्वाधिक सदस्य संचालक करण्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांनी बाजी मारली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलचे अधिकृत विजयी उमेदवार-

गट क्र. १ हिंजवडी- ताथवडे

१ नवले विदुराजी विठोबा (संस्थापक)

२ भुजबळ चेतन हुशार (नानासाहेब नवले)

३ जाधव दत्तात्रय गोपाळ (राष्ट्रवादी)

गट क्र. २ पौड – पिरंगुट

१ ढमाले धैर्यशील रमेशचंद्र (राष्ट्रवादी )

२ गायकवाड यशवंत सत्तू  (राष्ट्रवादी)

३ उभे दत्तात्रय शंकरराव (भाजप )

गट क्र. ३ तळेगाव वडगाव

१ भेगडे बापुसाहेब जयवंतराव (भाजप)

२ दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम (राष्ट्रवादी)

३ काशिद संदीप ज्ञानेश्वर (भाजप)

गट क्र. ४ सोमाटणे – पवनानगर

१ कडू छबुराव रामचंद्र (राष्ट्रवादी)

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

२ लिम्हण भरत मच्छिंद्र (राष्ट्रवादी)

३ बोडके उमेश बाळू (राष्ट्रवादी)

गट क्र. ५ खेड- शिरूर- हवेली

१ लोखंडे अनिल किसन (नानासाहेब नवले)

२ कातोरे विलास रामचंद्र (राष्ट्रवादी)

३ काळजे अतुल अरूण (भाजप)

४ भोंडवे धोंडीबा तुकाराम (भाजप)

महिला राखीव

१ अरगडे ज्योती केशव (शिवसेना)

२ वाघोले शोभा गोरक्षनाथ (राष्ट्रवादी)

अनुसूचित जाती / जमाती

भालेराव लक्ष्मण शंकर (राष्ट्रवादी)

इतर मागासवर्ग 

कुदळे राजेंद्र महादेव (राष्ट्रवादी )

विमुक्त जाती/भटक्या जमाती

कोळेकर शिवाजी हरिभाऊ ( राष्ट्रवादी)