सिंहगड पहिल्या दिवशीच चालकांनी केला चक्काजाम; पालक संतप्त संस्थेकडून थेट सुट्टी जाहीर

0
1

सिंहगड इन्स्टिट्यूट वारजे कॅम्पस शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी थेट संपाचं हत्यार उपसत चक्काजाम करत प्रवेशद्वारावरच हे आंदोलन केल्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून सकाळी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बसच न आल्याने थेट शाळेच्या आवारात आलेल्या पालकांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

सिंहगड इन्स्टिट्यूटची आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात असल्याने अनेक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची नियोजन केले होते. सकाळी वेळेवर संस्थेच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाड्याच न पोहोचल्याने थेट पालकांनी शाळेच्या आवारात जाण्याचा निर्णय घेत संस्थेला जात विचारण्याचा प्रयत्न केला परंतु पालक शाळेच्या आवारात पोहोचल्यावर त्यांना चालकांच्या आंदोलनाची कल्पना मिळाली. याबाबत संतप्त पालकांनी प्रशासनाला विचारणा करण्याचा प्रयत्न केला परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पालकही कमालीचे निराश झाले आहेत.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

संस्थेच्या वतीने चालकांच्या संपाची कल्पना असतानाही संबंधित पालकांना कोणताही निरोप देण्यात न आल्याने सर्व पालकांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संस्थेकडे कामाला असलेले चालक संप करण्याची कल्पना संस्थेला असल्या शिवाय संबंधित कर्मचारी कुठलेही संपाचे हत्यार उगारु शकत नाहीत. संस्थेच्या चालकांचे विषय शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच संपवणे आवश्यक असताना नाहक पालकांना त्रास देण्याचे हेतूनेच हे कृत करण्यात आल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.