निधी वादावर ‘एकनाथ शिंदे एक दिवस अजितदादांना थेट कॅबिनेटमध्येच जाब…’ भाजप नेत्याचे खळबळजनक विधान

0
1

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक नेते आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार करतील, असं वाटत नाही. मात्र, ज्या दिवशी त्यांना वाटेल, त्या दिवशी ते कॅबिनेटच्या बैठकीत थेट अजितदादांनाच जाब विचारतील, असे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदेंनी अजितदादांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याच्या चर्चेवर स्पष्ट केले.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुधीर मुनगंटीवार रविवारी (ता. 13 एप्रिल) हे पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-पवार यांच्यात निधी वाटपावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले, देश आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा भाजप हा पक्ष आहे. देशात आणि राज्यात याच भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे अजितदादा पवारही देशहितासाठीच भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याच्या चर्चेवरही सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी कोणतीही तक्रार केली नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. शिंदे हे आक्रमक नेते असून ते तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाहीत. त्यांना वाटत असेल तर तेच एक दिवस कॅबिनेट बैठकीत अजित पवार यांनाच जाब विचारतील, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात तीन पक्षांचे महायुती सरकार आहे. या सरकारमध्ये काही आलबेल असू नये, असे प्रयत्न काही लोक करतात. पण, भाजप हा देश आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. त्या राष्ट्रहिताच्या विचारातूनच अजित पवारही भाजपसोबत आलेले असावेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

माझ्याविरोधात काहींचे षडयंत्र

माझ्याविरोधात काहीजण षडयंत्र रचत आहेत, असे मी नाशिकमध्ये विनोदाने बोललो होतो. पण तसं काहीतरी करण्याचे काही लोक मुद्दाम ठरवत आहेत, असं आता वाटू लागलं आहे. त्या माध्यमातून काही तरी विपरीत घडवून आणायचं, असंही काही लोकांनी ठरवलं आहे, असं दिसतंय. शिवाय, मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

नमामि चंद्रभागेचे काम लवकरच पूर्ण होईल

भीमाशंकर ते पंढरपूर दरम्यान नमामी चंद्रभागा प्रकल्पाला मी अर्थमंत्री असताना मान्यता दिली होती. पुणे, पिंपरी चिंवडसह इतर महापालिका क्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे 995 कोटी रुपयांची एसटीपी योजना राबविण्यासाठी मंजुरी दिली होती. एसटीपी पंपाचे काम पंढरपुरातही सुरूही झाले आहे. चंद्रभागेचे प्रदूषण घाण पाण्यामुळे वाढत चालेले आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम सध्या सुरू आहे. पांडुरंगाच्या कृपेने नमामी चंद्रभागाचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षाही मुनंगटीवरा यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली