महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला. राज्यात अति महत्वकांक्षा असलेल्या दोन नेत्यांना यामध्ये फटका बसला ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. मूळ नैसर्गिक युती करत आहे अशी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेले यश ही खरी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी असून आगामी विधानसभा युतीसोबत लढायची की पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जायचं यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या चाचपणी केली जात असून 48 विधानसभा मतदारसंघाचा रिपोर्ट बनवण्यासाठी केलेली निरीक्षकांची नियुक्ती हे याचे संकेत आहेत. यासाठी भाजपने पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.






महाराष्ट्राच्या राजकारणात 2014 मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढाई लढल्यानंतर राज्याच्या पटलावरती देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने एक अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख झाली त्यांनी केलेल्या कामाची तारीफही झाली परंतु सत्ता उपभोग घेताना त्यांनी इतर मित्रपक्षांना दिलेल्या वागणुकीचा त्यांना 2019 मध्ये फटका बसला. पारंपारिक मित्रपक्ष शिवसेना यांनी 2019 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी सलगी करण्यास सुरुवात केल्यानंतर ‘सत्ता लालसी फडणवीस’ (72 तासाचा शपथविधी) ही देवेंद्र फडणवीस यांची एक दुसरी (काळी)बाजू पाहण्यास मिळाली. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही त्यांचा सत्ता मिळवण्याचा अट्टहास राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये साध्य केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राचा राजकारणात व्हिलन म्हणून नावावरूपास येत आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेचा लागलेला निकाल त्याचे संकेत देत आहेत. महाविकास आघाडी सरकार जाण्यास मुख्य कारणीभूत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र लोकसभा निवडणूक मध्ये समाधानकारक काम केले. देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार यांचे समीकरण सध्या भाजपच्या पश्चिम पडत नाही त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने एक नवा प्रयोग महाराष्ट्र मध्ये सुरू केला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मतदारसंघानिहाय आढावा घेणे आहे.
भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त फटका देवेंद्र फडणवीसांच्या वतीने केलेले डावपेच आणि फोडाफोडीचा राजकारणाचा झाला असतानाही पुन्हा एकदा प्रत्येक मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आलेले चेहरे जर पाहिले तर पुन्हा एकदा ‘टीम देवेंद्र’ च महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचे ‘व्हिक्टीम कार्ड’ चालण्याची काही शक्यता आहेत का? याची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी पराभव जबाबदारी स्वीकारली परंतु संघटनात्मक बदल न करता पुन्हा एकदा विजयाचा संकल्प केला याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती लढवल्या जातील. मुळात सभा टाळण्यापर्यंत या चेहऱ्याची गेलेली परिस्थिती असताना पुन्हा तो चेहरा मतदारांकडे घेऊन जाण्याचे ‘शिव धनुष्य’ उचलले आहे. केंद्रीय स्तरावरती कोणता निर्णय न होता पुन्हा एकदा नियोजनाने भारतीय जनता पक्षाचे लक्ष्य हे देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फतच विधानसभा निवडणुका असल्याचे आता सिद्ध झाले आहे?.
महाराष्ट्रातील जातीय समीकरणाचा विचार करता भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्ष नेतृत्वामध्ये बदल करण्याची गरज असतानाही कोणतेही बदल न करता देवेंद्र फडणवीसांच्या ‘व्हिक्टीम कार्ड’ वरच संघटन बांधण्यास प्राधान्य दिले आहे अशी संरचना करण्यात आली आहे. राज्यातील मतदार संघानिहाय नेमलेल्या निरीक्षकांची यादी जर पाहिली तर ही ‘टीम देवेंद्र’ अशी दोन्ही लेबल असलेले चेहरेच आहेत अशी भारतीय जनता पक्षातच चर्चा चालू झाली आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार श्रीकांत भारतीय, खासदार अनिल बोंडे, विजया रहाटकर, अशिष देशमुख, आमदार प्रवीण दटके, रणजीत पाटील, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, हर्षवर्धन पाटील, आमदार राणा जगजितसिंह, प्रवीण दरेकर, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार अमित साटम, गोपाळ शेट्टी असे निरीक्षक नेमण्यात आले आहेत.









