भाजपची आगामी मोहिमेसाठी फौज तयार; भाजपची स्वबळाची तयारी? दीड कोटी सदस्य संख्या! निवडणूकीत सदस्याला या गोष्टी पोहोचवणार!

0

भारतीय जनता पक्षाने नुकताच महाराष्ट्रातील सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात सदस्यसंख्येचा असा विशाल आकडा आतापर्यंत कोणत्याही पक्षाला गाठता आला नव्हता, त्यामुळे ही भाजपची ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.इतकेच नाही तर भाजपला लोकसभेमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी झाली आहे. भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 66 हजार 577 मते मिळाली होती. तर आता दीड कोटी सदस्य संख्या पूर्ण झाली आहे.

ही ऐतिहासिक कामगिरी करतानाच भाजपने आगामी निवडणुकांसाठी अगदी बारकाईने प्लॅनिंग केल्याचे दिसून येते. भाजपने महाराष्ट्रातील आता प्रत्येक 7 मतदारांमागे एक सदस्य उभा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 9.59 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 4.59 कोटी आणि महिला मतदारांची संख्या 4.64 कोटी आहे. तृतीयपंथीय मतदारांची संख्या 6 हजार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

आता भाजपचे दीड कोटी सदस्य पूर्ण झाले आहेत. म्हणजे प्रत्येक 7 मतदारांमागे भाजपचा एक सदस्य असणार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही आठ जण एकत्र उभे असाल तर त्यातील एक जण भाजपचा सदस्य असणार आहे. या सदस्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर अशा सगळ्या गोष्टी पक्षाकडे आहेत. निवडणूक काळात या सदस्याला धोरणे, प्रचाराचे मुद्दे, नेत्यांची भाषणे अशा गोष्टी पोहोचवल्या जाणार आहेत.

भाजपने सुरु केली स्वबळाची तयारी :

भाजप हा ‘जगातला सर्वांत मोठी सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणवून घेत असतो. चीनच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षाही ही सदस्य संख्या जास्त असल्याचा दावा पक्षातर्फे केला जातो आहे. महाराष्ट्रात यंदा लोकसभेत कामगिरी असमाधानकारक झाली तरी मागील निवडणुकीतील मतदानापेक्षा 775 मते जास्त मिळाली होती. विधानसभेत मात्र भरभरून यश मिळालेच शिवाय एक कोटी 72 लाख 93 हजार 650 मते झोळीत पडली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

मात्र या मतांमध्ये शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या मतांचाही वाटा होता. त्यामुळे स्वत:ची ताकद वाढविण्यावर भाजपने भर दिला. आधी राज्यात एक कोटी सदस्य संख्या करण्याचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट टप्प्यात दिसताच भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी 50 लाखांनी वाढवून दीड कोटींवर नेले. आता हेही टार्गेट पूर्ण झाले आहे. नागरिकांना मिस कॉल देणे किंवा ऑनलाइन नोंदणी करून पक्ष सदस्यत्व घ्यायचे होते.