मुंबई: अवकाळी पावसाचं कमी झालं असताना आता नवीन संकट आहे. महाराष्ट्रात उष्णतेचा लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. आता गारपीटनंतर महाराष्ट्र मे आधीच होरपळून निघणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडून सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे.
दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राजस्तानमध्ये देशातील सर्वात उष्ण राज्य म्हणून मागच्या 48 तासात नोंद करण्यात आली आहे. गुजरातकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबई, उपनगर आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी अजूनही गारपिटीचं संकंट म्हणावं तेवढं टळलेलं नाही.
महाराष्ट्रात पुढचे चार दिवस चार डिग्री सेल्सियस अधिक तापमानाची नोंद करण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर 2-4 डिग्री कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 8 आणि 9 एप्रिल रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अति उष्ण तापमान राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा पुढचे दोन दिवस देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये 10 एप्रिल रोजी गारपिटीचं संकट असेल असा इशारा हवामान विभागाने दिला. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळमध्ये ४२ डिग्रीपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. उकाड्याने लोक हैराण झाले आहेत.
10 एप्रिलनंतर पुन्हा वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचं संकट पुन्हा येईल. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य भारतापासून दक्षिणेपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. तर पश्चिम बंगालच्या खाडीत बाष्पीयुक्त वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे अवकाळी पावसाचे ढग, आणि सोबत कमालीची उष्णता असे बदल सतत होत आहेत.