“१२ बजे.”, कुणाल कामराविरोधात राहुल कनाल यांची पोस्ट चर्चेत, टेरर फंडिंगबाबत केला मोठा दावा!

0

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष विडंबन गीत सादर केलं. हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने धुमाकूळ घातला.

याप्रकरणी आता पोलिसांची चौकशी सुरू आहे. यादरम्यान, शिवसेनेच्या युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांची पोस्ट चर्चेत आली आहे. सरकारविरोधात कंटेटचा प्रचार करण्याकरता कुणाल कामराला दहशतवाद्यांकडून निधी मिळत असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला आहे.

“आपल्या माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री, माननीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध बोला, जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणे हे सर्वांनाच पचत नाही.. म्हणून कुणाल कोमरासारख्या कठपुतळ्यांना घेऊन दहशतवाद्यांकडून निधी घेऊन त्यांना पाठिंबा देऊन आपल्या देशाची आणि राज्याची अखंडता व कायदा सुव्यवस्थेला हानी पोहोचवली जात आहे’, असं राहुल कनाल म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

राहुल कनाल म्हणाले की ते कुणाल कामराचे यूट्यूब चॅनल बंद करण्याची आणि डिमॉनिटाइज करण्याची विनंती युट्यूबला करणार आहेत. त्यांनी असेही नमूद केले की ते खार पोलीस स्टेशनमध्ये पुरावे शेअर करतील आणि यूट्यूब कार्यालयाला भेट देतील. राहुल कनाल उद्या सकाळी खार पोलीस ठाण्यात ११ वाजता पुरावे सादर करण्याकरता जाणार आहेत. तसंच, युट्यूब ऑफिसलाही भेट देणार आहेत. तिथे ते कुणाल कामराचं चॅनेल बंद करण्याची विनंती करणार आहेत. तसंच, त्याच्या बँक खात्याचीही चौकशी करण्याची मागणी राहुल कनाल यांनी केली आहे.