आपलं काम जागांच्या साठेमारीत आपण मारलं हे लोकांना सांगू शकलो नाही; त्यांनी मात्र हेतू परस्पर…. ठाकरेंकडून चुकीची जाहीरपणे कबुली

0

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज निर्धार शिबिरात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून झालेली चूक जाहीरपणे मान्य केली. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप केला जात होता. पण आता अखेर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामागील कारण मान्य केलं आहे. “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की, आपण गाफील राहिलो. लोकसभेला आपण आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो, त्वेषाने लढलो. तर महायुती लोकसभेला आपणच जिंकणार कारण मोदी आहेत अशा अविर्भावात होते”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

“लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका आल्या. मधल्या काळात मतदारांचे घुसवाघुसवी झाली. आपण ज्या मानसिकतेत होतो की, आपल्याला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत, अगदी आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट शिवून तयार होते. बस आता जिंकलोच, मी घोड्यावर बसणार आणि विधानसभेत जाणार. त्या निकालानंतर मला काही जणांनी सांगितलं, काँग्रेसवाले काही लोक आले, राष्ट्रवादीवाले काही आले, आणि म्हणाले एक चूक झाली ती झालीच. ते नाव जाहीर करायचं सोडून द्या. त्याचा इतिहास झाला. पण त्यांनी सांगितलेलं फार महत्त्वाचं होतं. विधानसभेत आपण केलेलं काम हे जागांच्या साठेमारीत आपणच मारुन टाकलं”, असं उद्धव ठाकरे जाहीरपणे म्हणाले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

‘लोकांना आपण आपलं काम सांगूच शकलो नाही’

“हे खरं आहे. आपण काय करत गेलो? तुम्ही किती देणार? एवढे, तुम्ही काय करणार हे, आम्ही हे, याच्यात राहिलो. अरे पण आपण उत्तमरित्या सरकार चालवून दाखवलं. जगभरात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती होती त्यावेळीही आपण महाराष्ट्र थांबू दिला नव्हता हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही. तेच काम त्यांनी केलं. भ्रष्टाचाराचा नुसता आगडोंब केला. इथे सुरज बसला आहे. काय? खिचडी घोटाळा? संजय राऊतला आतमध्ये टाकलं होतं. पण घाबरुन सोडून दिलं. जा बाबा जा. तिकडे गेलास तर बरं. काही शेपट्या घालून गेले. त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जणू काही गंगास्नान घातलं”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एकदिवस आधी महाविकास आघाडीला आपल्या विजयाची खात्री होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार यावरुन मविआत विविध दावे केले जात होते. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी जागावाटपावरुन मविआत प्रचंड संघर्ष बघायला मिळाला होता. तसेच काही ठिकाणी झालेली बंडखोरी यामुळे त्याचा मविआला फटका बसला होता. हेच उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मान्य केलं आहे.