मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा ४०० जागा जिंकून सत्तेत येण्याचे लक्ष्य ठेवणारे दक्षिण भारतावर विशेष फोकस ठेवला आहे. अन्य राज्यांवरही त्यांचे लक्ष आहे. त्यात ४८ जागा असलेले महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. महाराष्ट्रातही मिशन@४५ ची घोषणा केली आहे. राज्यातील असंख्य मित्रपक्षांची मदत घेत भाजपच्या वतीने उद्दिष्ट गाठण्याचे काम केले जात आहे परंतु निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसेच भारतीय जनता पक्षाच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्य मध्ये गेली पाच वर्ष असलेले कुरघोडीचे राजकारण अन् निवडणुका तोंडावर असतानाही रसलेली पक्षांतरे यामुळे पक्षाच्या मतांमध्ये जळत होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी १० एप्रिलपासून महाराष्ट्रात निवडणूक अभियान सुरू करणार आहेत. राज्यात त्यांच्या तब्बल १८ सभा होणार आहेत.






भारतीय जनता पक्षातील महाराष्ट्राची वाटचाल लक्षात घेण्यासाठी सध्या पक्षाच्या वतीने वारंवार सर्व्हे केले जात आहेत. विरोधकांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवून पूर्ण एकजूट करत एक बुलंद मूठ बांधण्याचे काम शरद पवार यांनी केले असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मतांमध्ये वारंवार बदल होत आहे. याच सुमारास एबीपी न्यूज आणि सी-वोटर यांनी राज्यात सर्वेक्षण केले आहे. त्याचा भाजपला फटका बसू शकतो कारण साधारण एक महिन्यांपूर्वी भाजप पुढे असल्याचे दिसत होते. मात्र आता पक्ष मागे पडत असल्याचे आढळून येते आहे. महाविकास आघाडीशी एकसंघ राहिलेले पक्षही ऐनवेळी भाजपाच्या बाजूला गेल्यामुळेही भारतीय जनता पक्षाची मते घटत चालली आहेत.
सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडिए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी या दोघांना समान म्हणजे ४१ टक्के मिळत असल्याचे दिसते आहे. मागच्या महिन्यात एनडीएच्या खात्यात ४३ टक्के मते जातील असा अंदाज वर्तवला गेला होता. तर इंडियाला ४२ टक्के तर अन्य पक्षांच्या खात्यात १५ टक्के मते जातील असा अनुमान होता. आता ताज्या सर्वेक्षणात अन्य पक्षांची मते वाढत असल्याचे दिसत असून १८ टक्के मते त्यांच्याकडे जातील असे भाकित आहे.











