IPL मध्ये पेटला पाणीप्रश्न… चिन्नास्वामी स्टेडियमवर नाही होणार RCBचे सामने?

0

बंगळूर शहरातील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. याची दखल राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) घेतली असून आयपीएल सामन्यांसाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर वापरण्यात आलेल्या पाण्याची माहिती सादर करण्याचे आदेश या राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने सर्व संबंधितांना दिले आहेत.

केवळ कर्नाटक क्रिकेट संघटनाच नव्हे तर बंगळूरुमधील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, कर्नाटक वायू प्रदूषण मंडळ यांनाही आदेश देऊन २ मे पर्यंत बंगळूरमधील पाण्याच्या उपलब्धतेची माहिती कळवण्यास सांगण्यात आले आहे.

एनजीटीने पाठवलेल्या नोटिशीचा अभ्यास आम्ही करत आहोत, तसेच त्यांच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आम्ही अगोदरपासून करत आहोत. त्यामुळे आयपीएलमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर पुढे होणाऱ्या सामन्यांच्या आयोजनात कोणतीही आडकाठी येणार नाही, असे स्पष्टीकरण कर्नाटक क्रिकेट संघटनेचे सीईओ शुबेंदू घोष यांनी दिले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

चिन्नास्वामी स्टेडियमवर पिण्याचे पाणी वापरण्यात येत आहे, या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत एनजीटीने सुओ मोटो दाखल करून घेतली आहे. एनजीटीचे प्रमुख न्यायाधीश प्राश श्रीवात्सवा आणि डॉ. सेंथिल वेल यांनी ही याचिका दाखल केली आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत तीन सामने झाले असून प्रत्येक सामन्यासाठी ७५ हजार लिटर पाणी वापरण्यात आल्याची माहिती आहे. या स्टेडियमवर १५ एप्रिल (बंगळूर वि. हैदराबाद), ४ मे (बंगळूर वि. गुजरात), १२ मे (बंगळूर वि. दिल्ली) आणि १८ मे (बंगळूर वि. चेन्नई) हे चार सामने नियोजित आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

आम्हाला प्रत्येक सामन्यासाठी १५ हजार लिटर पाणी लागते आणि ते आम्ही आमच्या एसटीपी प्लांटमध्ये असलेल्या टाकीतून वापरतो, असेही घोष यांनी सांगितले. कर्नाटक संघटनेने काही वर्षांपूर्वीच अतिशय अत्याधुनिक आणि भारतात प्रथमच असलेली एसटीपी प्लांटची निर्मिती केली आहे.