धनंजय मुंडे राजीनाम्यावर मुख्यमंत्र्‍यांकडून भाष्य; चहापान कार्यक्रमाला मुंडे हजर अण्णा हजारेंबद्दलही स्पष्टच बोलले

0

राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे.विशेष म्हणजे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंच्या काळात कृषी खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर, संतोष देशमुख हत्याप्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देखील त्यांनी तीव्र भावना व्यक्त करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, सरकारकडून त्यांची पाठराखण करण्यात येत आहे. राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी आयोजित चहापान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारने आधीच भुमिका स्पष्ट केली आहे, असे म्हणत दोषी आढळल्यानंतरच त्यांचा राजीनामा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सूचवले आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मोठा दावा केला होता. 3 तारखेला धनंजय मुडेंचा राजीनामा होईल, असे करुणा शर्मा यांनी सोशल मीडियातून म्हटले होते. त्यामुळे, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारने आधीच भुमिका स्पष्ट केली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण न्यायालयीन आहे, कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्याबाबत आम्ही भूमिका घेऊ, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. त्यामुळे, सरकारमधील दोन्ही मंत्र्यांचा बचाव मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ⁠अण्णा हजारे यांनी देखील धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे असे वक्तव्य केलं होतं. तर, सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील राजीनाम्यासंदर्भात बोलताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं समर्थन केल्याचं दिसून आलं. मात्र, सरकारने त्यांचा राजीनामा अद्यापही घेतला नाही. त्याच, अनुषंगाने प्रश्न विचारल असता, अण्णा हजारे यांचा आम्ही आदर करतो, आमची यावर चर्चा झाली आहे. ⁠ज्यावेळी वाटेल नैतिकतेचा मुद्दा उपस्थित होतो, त्यावेळी मात्र भूमिका घेतली जाईल.⁠ आम्ही यावर खूप काही चर्चा केली आहे, असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

चहापान कार्यक्रमाला धनंजय मुंडे हजर

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दरम्यान, आजच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, गेल्या कॅबिनेट 3 बैठकींना गैरहजर राहिलेले धनंजय मुंडे आज चहापान कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी चहा पितानाचा त्यांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे, सध्यातरी धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत सरकारच्या मनात काहीही नसल्याचे दिसून येते.