पुणे शहरात सध्या एकच चर्चेचा विषय आहे तो म्हणजे एकता नगर या भागामध्ये उद्भवलेली पूर परिस्थिती! ही बाब गंभीर आहे. पण ही परिस्थिती खरंच निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित याचा विचार करण्याची गरज आहे कारण पुणे महापालिकेच्या लोगोत जरी ‘वरं जनहितम ध्येयम्’ असा उल्लेख असला तरी गेल्या वीस वर्षातील पुणे महानगरपालिकेचा कारभार पाहिला तर नैसर्गिक प्रवाहावर बाधा आणत शहरातील सुमारे 1740 एकर बिगर निवासी क्षेत्र ‘निवासी’ करण्याचा प्रताप पुणे महानगरपालिकेने केला आहे असा आरोप माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी केला आहे. याबरोबरच खडकवासला धरणातून विसर्ग सुरू असताना सुरुवातीलाच नांदेड सिटी कॉर्पोरेशन यांनी बेकायदेशीर रित्या नदीपात्राच्या मध्ये गोल क्लब उभारण्यासाठी वीस बावीस फूट उंच भराव टाकला आहे त्यामुळे त्याचा फटका हा खडकवासला स्मशानभूमीला तर झालाच पण पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे विसर्ग पासून पुणे शहर शेवटापर्यंत सर्वत्र नदी आणि नाल्यांवरती झालेल्या अतिक्रमण हे खरे कारण आहे. सध्या बाधित लोकांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये राजकीय लोक व्यस्त आहेत परंतु मुख्य समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही हीच खरी खंत आहे. स्वच्छ पुणे सुंदर पुणे ती अभिमानाने भुषवण्याची गोष्टचं इतिहास जमा झाली असून आता फक्त इव्हेंट आणि व्यवसायिक हित यावरच पुणे महानगरपालिका काम करत असल्याने तमाम पुणेकरांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात येत आहे.






पाटबंधारे विभागाने किती क्युसेक्स पाणी सोडले याबाबत जरी मत भिन्नता असली तरी खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गानंतर मुठा नदीमध्ये खालील प्रमुख ९ओढे, नाल्यांच्या मधून पाणी येत असतं याचा विचार करणे आवश्यक होते.
१) खडकवासला डोंगर
२) आर्वी, किरकीटवाडी, नांदोशी,
३) सावित्री गार्डन ओढा
४)जांभूळवाडी नऱ्हे
५)वडगाव ब्रिज ओढा
६) ब्रह्मा हॉटेल
७) पाटील हॉस्पिटल
८) रांका ज्वेलर्स
९) कोंढवे धावडे आगळंबे अहिरे येथून येणारे ओढे आणि नाले यातून देखील मोठ्या प्रमाणावर विसर्ग होतो झाला याचा विचार झाला का नाही याबाबत देखील शासनाने महानगरपालिकेने चौकशी करणे आवश्यक आहे.
या ठिकाणी पाटबंधारे विभागाने पूर्व सूचना दिली नाही जी पूर्व सूचना दिली त्यापेक्षा जास्त विसर्ग झाला तसेच महानगरपालिकांनी देखील योग्य ती खबरदारी घेतली नाही यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. हा विषय प्रशासनाशी प्रशासकीय बाबींची संबंधित असला तरी त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांमार्फत चालू आहे. सगळ्या पूर परिस्थितीचा खापर नदी सुधार योजना river front development या प्रकल्पावर फोडण्याचे काम चालू आहे. ही परिस्थिती उद्भवत असेल तर त्याचा योग्य तो पुनर्विचार शासनाने महानगरपालिकेने केला पाहिजे कारण पुणेकर नागरिकांचे जीवन त्यांची मानसिक स्वास्थ्यता ही महत्त्वाची आहे.
१) सर्वे ऑफ इंडिया यांनी पुण्यातील सर्व महत्त्वाचे नाले आणि ओढे हे नकाशावर दर्शविले आहेत हे नकाशे महानगरपालिकेकडे उपलब्ध आहेत.
२) prime move survey यामध्ये शहर वेगवेगळ्या बेसिनमध्ये विभागले गेलेले दर्शविले होते या सर्व्हेचा आणि नकाशांचा अंतर्भाव 2007 ते 27 या विकास आराखड्यात होणे आवश्यक असतानाही दुर्दैवाने ते झाले नाही.
३) निसर्गाने निर्माण केलेला ओढा अथवा नाला मानव कसा काय बदलू शकतो हलवू शकतो नाले फिरवण्याचा अधिकार विकास योजना आणि बांधकाम परवानगी या विषयाकडे दिला.
४) आंबील ओढ्यावर झालेले अतिक्रमण
५) नागझरी नाल्यावर झालेले अतिक्रमण
६) माणिक नाल्यावर झालेले अतिक्रमण.
७) भैरोबा नाला झालेल्या अतिक्रमण
८) 2027 या विकासा आराखड्यामध्ये जमीन वापराचे सर्वेक्षण existing land use (ELU) यामध्ये जलस्त्रोत (water body) चे क्षेत्र ६.३७% इतके दर्शविले होते.
९) प्रारूप विकास आराखड्यामध्ये राम नदी दाखवण्याचे विसरले होते.
१०) महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात हे क्षेत्र ४.७३% इतके दर्शविले आहे. Propose land use (PLU) 1.64% इतके क्षेत्रफळ कमी दाखवले या क्षेत्रफळाचा एकूण क्षेत्रफळाशी विचार केला असता ६९६.०७ हेक्टर म्हणजे 1740 एकर हे क्षेत्र निवासी विभागात रूपांतरित केले.
११) कल्याणी नगर वडगाव शेरी खराडी या भागामध्ये सर्वाधिक पद्धतीने नाले बदलले त्यांचे मार्ग बदलले नैसर्गिक मार्गावर बिल्डिंग उभ्या केल्या त्यामुळे त्या भागामध्ये हा प्रश्न तीव्रतेने जाणवतो.
वरील बाबी आणि वस्तुस्थिती मांडण्याचा कारण एवढेच अनेक वर्षापासून दुर्लक्ष केलेलं जलस्त्रोत त्यांचं महत्त्व, व्यावसायिक हितसंबंध सांभाळणे या सगळ्या गोष्टीचा परिपाक हा या सगळ्या पूर परिस्थितीमध्ये होतो असं आमच्यासारख्या पुण्याचा विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटते.
महाराष्ट्र शासनाने आणि महानगरपालिकेने जलसंपदा विभागाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत पुणेकर नागरिक सुरक्षित राहिला पाहिजे त्याचे जीवन सुरक्षित राहिले पाहिजे त्याला त्रास होता कामा नये ही एकमेव भावना या सगळ्या मागची आहे ज्याचा विचार मुख्यमंत्री महोदय करतील उपमुख्यमंत्री पालकमंत्री महोदय करतील असा विश्वास माझी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर यांनी व्यक्त केला आहे.











