संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कोण वाचणार अन् कोणाला शिक्षा? ‘यामुळे’ सगळं होणार क्लिअर सीआयडीचे तब्बल 1500 पानी दोषारोप

0

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. राज्यभर आंदोलने झाली, संतोष देशमुख कुटुंबाने आक्रमक भूमिका घेतली. आता मात्र, या हत्येचा संपूर्ण तपशील या दोषारोप पत्रातून उलगडणार आहे. सीआयडीच्या तपासानुसार, खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा सहभाग आहे का? हे तपासातून स्पष्ट होईल. “या प्रकरणात सात आरोपींनी कशा प्रकारे कट रचला, हत्या केली आणि त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आहे, यासंबंधी पुरावे चौकशीतून समोर  येणार आहे..

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

आरोपींनी हत्येसाठी वापरलेली शस्त्रे कोणती? हल्ला कसा झाला? हत्येची वेळ आणि ठिकाण कोणते? हे ही दोषारोप पत्रातून उघड होईल. तसेच, आरोपी फरार होण्यात कोणाच्या मदतीने यशस्वी झाले आणि त्यानंतर ते कुठे लपले होते? याचाही तपास करण्यात आला आहे. याशिवाय, कुठल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला? याचाही तपास सीआयडीने केला आहे.

याच प्रकरणाशी संबंधित खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांमध्ये काही संबंध आहे का? याचाही तपास करण्यात आला आहे.

‘डिजिटल पुराव्यांमधून (CDR डेटा) कोणाशी संपर्क झाला? वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या संघटित गुन्हेगारीतील आणखी काही बाबी समोर येणार का? आरोपींनी खंडणीमधून मिळवलेल्या संपत्तीचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे? आम्हाला न्याय हवा! हा गुन्हा फक्त एका व्यक्तीने नाही, तर एका मोठ्या टोळीने केला आहे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.’ अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार