एकीकडे शासकीय मोबदला अन् पुन्हा FSI ही लाटून खोट्या तक्रारीद्वारे विकसकाकडे खंडणी’: गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0
3

मुळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे विचार आणि आचरण असल्याने बनावट कागदपत्राची जुळवा जुळव करून कर्वेनगर भालेकर वस्ती मधील सर्व्हे नं. 14 मध्ये जागा मालकाने शासकीय मोबदला आणि एफएसआय असा दुहेरी मलाई कमावण्याचा कार्यक्रम यशस्वी केलेला असतानाच पुन्हा जुन्या विकसकाकडे ‘खंडणी’ मागणाऱ्या जागा मालकांच्या विरोधात पुणे न्यायालयाने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पानशेत धरणफुटी नंतर पुणे शहरालगतच्या गावांमधील पुनर्वसन वसाहतीला पानवठ्याचा रस्ता म्हणून कर्वेनगर सर्व्हे क्र.१४ मध्ये शासकीय रस्ता(४० फुटी) आरक्षित करण्यात आला होता; या जागेचा शासनाकडुन मोबदला स्विकारलेला असतानाही उर्वरित जागा विकसित करताना पुन्हा त्याच जागेचा इमारतीमध्ये FSI घेऊन शासकीय यंत्रणेची फसवणूक करण्यात आली आहे. कागदपत्रांची फेरफार करून शासकीय नियमांची ‘पायमल्ली’ करत दुहेरी ‘मलाई’ लाटणाऱ्या या जागा मालकांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आल्यानंतर संबंधित जागा मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

वडिलोपार्जित जमिनी स्वतः भागीदारी असलेल्या संस्थेकडे विकसित करण्यास देण्यास देऊन अन्य भागीदारी सभासदांची ही फसवणूक केली असल्याचे सुनावणीदरम्यान निष्पन्न झाले. वडिलोपार्जित मिळकती विकसित झाल्यानंतर संबंधित भागीदारी व्यवसायातून कायदेशिर निवृत्ती घेऊन सर्व हक्क संपुष्टात आल्यानंतरही तब्बल 14 वर्षांनी खोट्या व बनावट तक्रारी करून त्या मागे घेण्यासाठी ‘खंडणी’ मागणे, धमकावणे यासह न्यायालय, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग आणि ‘महारेरा’कडे खोट्या व बनावट तक्रारी करून खोट्या नोटीसा, ब्लॅकमेलिंग इ. गुन्हेगारी कृत्याच्या अनुषंगाने आरोपी गोरख नारायण भालेकर, राजेंद्र नारायण भालेकर, सौ. रेशमा गोरख भालेकर (सर्व रा. जकात नाका, कर्वेनगर, पुणे) कुणाल सुनिल सरवदे (रा. बहुली, पुणे) शशिकांत राघू सरवदे रा. बहुली पुणे), रफीक जमादार (रा. वारजे पुणे) या ६ जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३च्या कलम २२७, २२८, २३६, २४६, ३०६(२), ३१८(३), ३५१(३), आर/डब्ल्यू. कलम ३(५) अंतर्गत दंडनीय गुन्हे केले आहेत. म्हणून, आरोपी क्रमांक १ ते ६ वरील बी.एन.एस.एस. च्या कलम २२७ नुसार पुणे न्यायदंडाधिकारी, प्रथमवर्ग यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

या प्रकरणी भूसंपादित जागेबाबत दि. 30/8/2021 रोजी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे फिर्यादी श्री. बाळासाहेब बबनराव बराटे (रा. कर्वेनगर, पुणे) यांनी तक्रार अर्ज दिला. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच फिर्यादी व त्यांचे व्यवसायिक भागीदार, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या विरोधात वकिलामार्फत खोट्या नोटीसा पाठवणे, खोटे कोर्ट केसेस या संदर्भात फिर्यादीने अॅड. सचिन ताठे यांच्या मार्फत पुणे येथील न्यायदंडाधिकारी, प्रथमवर्ग यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला. त्याची दखल घेऊन न्यायालयाने वरील ६जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.