भारती विद्यापीठाचे यशवंतराव मोहिते महाविद्यालयाचे 1978 ते 1983 मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच भुकूम येथील श्री चंद्रकांत भरेकर व विठ्ठल भरेकर यांच्या तन मन आयुर्वेदिक रिसॉर्ट फार्म हाऊसवर अतिशय उत्साहात आनंदात संपन्न झाला. मुंबई, सांगली, सातारा, करमाळा, मांडवगण फराटा, पुणे, नवी मुंबई, वरळी, जामखेड व पुणे जिल्ह्याच्या व शहराच्या विविध भागातून सर्व विद्यार्थी मित्र या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले होते.
प्रत्येकाने आपली ओळख व कॉलेज नंतरचा आपला जीवनपट आपल्या भाषणातून नमूद केला, या विद्यार्थ्यांमधून अनेक जण विविध पदावर काम करून रिटायर सुद्धा झाले, कुणी सामाजिक कार्यात कोणी राजकारणात, कोणी पोलीस खात्यात, कोणी महसूल खात्यात कोणी, खाजगी व्यवसायात आपापले योगदान देऊन आपला जीवनपट आपल्या भाषणातून मांडण्याचा प्रयत्न केला, अतिशय सुंदर उत्साहवर्धक आणि नवचैतन्य निर्माण करणारा असा हा मेळावा आयुष्यभर सर्वांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने संपन्न झाला या मेळाव्यासाठी गुरुवर्य प्रा.तागड सर, गुरुवर्य प्रा. शिकलगार सर व गुरुवर्य प्रा.धांडे सर या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित होते, सर्व प्राध्यापकांनी सुद्धा याप्रसंगी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं, या मेळाव्याच्या प्रसंगी नुकतीच CEDARBROOK UNIVERCITY USA यांच्यावतीने आनंद तांबे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार गुरुवर्य प्रा. तागड सर व सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीने करण्यात आला, त्याचप्रमाणे आपल्या कारकीर्दीत उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मांडवगण फराटा येथील विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष आबा उर्फ महादेव फराटे यांचा सुद्धा सत्कार या प्रसंगी करण्यात आला त्याचप्रमाणे पोलीस खात्यात उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मिरघे व माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय बगाडे , उप पोलीस निरीक्षक जयसिंग कदम यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला या स्नेह मेळाव्यासाठी यशवंतराव मोहिते कॉलेजच्या 1983 च्या बँच चे ग्रॅज्युएट पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थी या स्नेहसंमेलनासाठी दिवसभरासाठी उपस्थित होते सर्वांनी एकमेकाची ओळख करून घेत आपापल्या आयुष्यात केलेल्या कामगिरीची माहिती आपापल्या भाषणात दिली, चहा नाश्ता ,जेवण, नाच गाणे, दंगामस्ती, फुल एन्जॉय दिवसभर सर्वांनीच केला. या स्नेह मेळाव्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले विठ्ठल भरेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रदीप भोईटे, बंडू हरपुडे ,दत्ता गांधी, सुरेश मिरगे, कैलास ढमाले तसेच या स्नेह मेळाव्याची संकल्पना मांडणारे पांडुरंग निकम यांचेही या प्रसंगी आभार मानण्यात आले, अतिशय उत्साहात आनंदात आणि भूतकाळातील आठवणींना उजाळा देत भविष्यकाळात पुन्हा पुन्हा भेटण्याचा एकमेकांना शब्द व आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता झाली, पुढील स्नेह मेळावा माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मिरगे यांच्या फार्म हाऊस वर संपन्न होईल असे स्वतः सुरेश मिरगे यांनी याप्रसंगी सांगितले.