अपघातग्रस्त तरुणाची साखळी लांबवली; मदतीच्या बहाण्याने दोघांनी घात केला

0
2

टिळकनगरमधील श्रीराम चौकाजवळ बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पडलेल्या तरुणाची सोनसाखळी मदतीच्या बहाण्याने लांबवण्यात आली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन महाजन (वय ३२) हे पत्नीला घेऊन दुचाकीवरून जात असताना खड्ड्यामुळे दोघे खाली पडले. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती मदतीच्या बहाण्याने जवळ आले आणि त्यांनी महाजन यांच्या १७ ग्रॅम वजनाच्या, अंदाजे ₹७५,००० किंमतीच्या सोनसाखळीची चोरी केली. तसेच दुचाकीची किल्ली घेऊन पसार झाले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार