पुणे गुंडांचा हैदौस सुरूच, जखमी झाल्याने उपचारास जाताना पुन्हा गाठलं अन् थेट अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं

0

पुणे: एकीकडे पुण्यातील स्वारगेटमध्ये एका तरुणीवर बसमध्ये बलात्काराची घटना ताजी असतानाच आता पुणेकरांना हादरवून टाकणारी दुसरी घटना समोर आली आहे. काही वेळापूर्वीच पुण्यातील एका बार चालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिंवत जाळण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ परिसरात काही गुंडांनी हैदौस घालून एका बार चालकावर पेट्रोल टाकून त्याला जिंवत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती नुकतीच समोर आली आहे.

नेमकी घटना काय?

पुण्यातील एका बारच्या काही तरुण गुंडागर्दी करत होते. त्यामुळे बार चालकाने बाहेर येऊन या मुलांना हटकलं. पण याच गोष्टीचा राग येऊन या गुंडांनी थेट बार चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. अत्यंत बेदम मारहाण करत गुंडांनी बार चालकाला गंभीर जखमी केलं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दरम्यान, बार चालकाने या गुंडांच्या हातून कशीबशी स्वत:ची सुटका करवून घेतली. पण मारहाणीत जखमी झाल्याने तो उपचारासाठी रुग्णालयात जाण्यास निघाला. पण याचवेळी मारहाण केलेल्या गुंडांनी त्याला पुन्हा एकदा रस्त्यात गाठलं. यावेळी त्यांनी थेट या बार चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय का?

पुण्यात बलात्कार, खून, गुंडगिरी या गोष्टी अत्यंत सर्रासपणे सुरू आहेत. अशावेळी आता पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय का? असा सवाल पुणेकर करू लागले आहेत. पुण्यातील गुंडगिरी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण त्यावर पोलीस प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याचं दिसून येत आहे. अशावेळी आता राज्य सरकार या सगळ्याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार